मुंबई: बिर्याणी (Biryani) म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणारच. आपल्या अवतीभोवतीचे अनेकजण दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या वेळी बिर्याणी ऑर्डर देण्यास प्राधान्य देतात. पण मग कधी-कधी ऑनलाईन ऑर्डर देताना चूक होते आणि त्यानंतर गोंधळ निर्माण होतो. असाच काहीसा गोंधळ मुंबईतील एका मुलीसोबत झाल्याचं उघड झालं आहे. मुंबईतील एका मुलीने जेवणाची ऑर्डर देण्यासाठी तिचा फोन उचलला तेव्हा तिने लगेच बिर्याणीची निवड केली. पण मद्यधुंद अवस्थेत तिने चुकून दुसऱ्या राज्यातून (Biryani From Bengaluru) ऑर्डर दिली. त्यानंतर जे घडले ते खूपच मनोरंजक आहे.


मुंबईतील एका मद्यधुंद मुलीने चुकून बंगळुरुमधील मेघना फूड्स रेस्टॉरंटमधून 2500 रुपये किंमतीची बिर्याणी ऑर्डर केली. ही ऑर्डर झोमॅटो (Zomato Biryani) या फूड डिलिव्हरी कंपनीच्या अॅपवरुन देण्यात आली होती. विशेष म्हणजे मुंबईतून दिलेली बंगळुरुतील बिर्याणीची ऑर्डर झोमॅटोने डिलिव्हर केली. ऑर्डर मिळाल्यानंतर मात्र हा सगळा प्रकार त्या मुलीच्या लक्षात आला. त्यानंतर तिने आपल्या ऑर्डरचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो ट्विटरवर शेअर केला. मी बंगळुरुहून 2500 रुपयांची बिर्याणी मागवली होती का? अशा प्रकारचं तिनं ट्वीट केलं. 


ही पोस्ट 21 जानेवारी रोजी टाकण्यात आली होती आणि त्यानंतर त्यावर लाखो कमेट्स आल्या. Zomato Twitter टीमने यावर ट्वीट करत मजेदार कमेंट केली. झोमॅटोने म्हटलं आहे की, "सुबी, ऑर्डर तुमच्या दारात आल्यावर तुम्हाला हँगओव्हरचा आनंदी अनुभव मिळेल. आम्हाला या अनुभवाबद्दल नक्की कळवा."




Drunk Mumbai Girl Accidentally Ordered Biryani: त्या मुलीने शेअर केला फोटो 


नंतर जेव्हा या मुलीला तिची ऑर्डर मिळाली तेव्हा तिने बिर्याणी, सालन, रायता आणि चिप्स असलेल्या तिच्या जेवणाचे फोटो देखील शेअर केले. तिने गमतीने लिहिले,  "@zomato हा आतापर्यंतचा सर्वोत्तम निर्णय, माझा पगार कुठे आहे?


बिर्याणी भारतीयांची सर्वाधिक पसंतीची डिश 


ऑनलाइन जेवण ऑर्डर करताना बिर्याणी ही भारतीयांची पहिली पसंती असल्याचं झोमॅटोच्या (Zomato) अहवालातून स्पष्ट झालंय. 2022 आणि त्या आधीच्या वर्षात बिर्याणी ही सर्वात जास्त ऑर्डर केलेली डिश होती.सलग सातव्या वर्षी चिकन बिर्याणी ही ऑर्डर केलेली टॉप डिश होती असं स्वीगीनेही म्हटलं आहे. 


ही बातमी वाचा :