Zhanna Samsonova Death : विगन रॉ फूड इन्फ्लुएंसरचा (Vegan Raw Food Influencer) उपासमारीने (Starvation) मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. झान्ना सॅमसोनोवा (Zhanna Samsonova) नावाच्या विगन इन्फ्लुएंसरचा वयाच्या 39 वर्षी मृत्यू झाला आहे. ती झान्ना डी'आर्ट (Zhanna D'Art) या नावाने प्रसिद्ध विगन रॉ फूड इन्फ्लुएंसर होती. महत्त्वाचं म्हणजे तिने गेले काही दशकं फक्त कच्चा विगन आहार घेत होती. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, झान्ना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या विगन कच्च्या आहारासंबंधित विविध माहिती पोस्ट करायची.
विगन रॉ फूड इन्फ्लुएंसरचा उपासमारीने मृत्यू
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, विगन रॉ फूड इन्फ्लुएंसर झान्ना सॅमसोनोवा (Zhanna Samsonova) नावाच्या 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ती अनेक वर्ष कच्च्या शाकाहारी आहारावर होती. ही महिला थायलंडची रहिवाशी असल्याची माहिती आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ती नेहमी कच्च्या विगन आहाराबाबत माहिती शेअर करत असे. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, झान्ना डी'आर्ट या महिलेचा 21 जुलै रोजी मृत्यू झाला.
एक दशकापासून विगन आणि कच्चा आहार
सॅमसोनोवा तिच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, कमीत कमी एक दशकापासून पूर्णपणे विगन आणि कच्चा आहार घेत होती. तिच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, "काही महिन्यांपूर्वी, श्रीलंकेत, झान्ना खूप थकलेली दिसत होती. तिचे पायही सुजले होते, त्यामुळे तिला नीट चालताही येत नव्हतं. त्यानंतर तिला उपचारासाठी घरी पाठवलं. पण, ती पुन्हा पळून गेली. जेव्हा मी तिला फुकेतमध्ये पाहिलं, तेव्हा तिची तब्येत पाहून मी तेव्हा घाबरले." तिच्या मैत्रिणीने पुढे सांगितले की, "मी इमारतीत तिच्या वरच्या मजल्यावर राहत होते. मला दररोज सकाळी तिचा मृतदेह सापडण्याची भीती वाटत होती. मी तिला उपचार घेण्याचा सल्ला दिला, पण तिने ते यासाठी नकार दिला."
विगन रॉ फूडमुळे संसर्ग
सॅमसोनोवाच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीचा मृत्यू कॉलेरा सारख्या संसर्गाने झाला आहे. मात्र, झान्नाच्या मृत्यूचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. तिच्या आईने पुढे सांगितले की, तिला विश्वास आहे की, थकवा आणि सर्व-शाकाहारी कच्च्या आहारामुळे तिच्या शरीरावर ताण आल्याने सॅमसोनोवाचा मृत्यू झाला आहे.
कच्च्या विगन आहाराचे फायदे आणि दुष्परिणाम
वैद्यकीय आरोग्य वेबसाइट हेल्थलाइनच्या मते, कच्च्या विगन अन्न आहारामध्ये काही तोटे आहेत. कच्च्या विगन आहारामुळे वजन कमी होणे, हृदयाचे आरोग्य सुधारणे आणि मधुमेहाचा कमी धोका यासारखे अनेक फायदे असले तरी, याचे काही तोटे देखील आहेत.
कच्च्या विगन आहाराच्या दुष्परिणामांमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता हे प्रमुख आहे. निरोगी हाडांसाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम दोन्ही फार आवश्यक आहेत. याव्यतिरिक्त, कच्च्या विगन आहारामुळे शरीरातील बी12 ची पातळी होऊ शकते. हे हृदयविकार, अशक्तपणा, न्यूरोलॉजिकल सिस्टमला हानी आणि वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकते.