WhatsApp Fact Check : सोशल मीडिया आणि त्यावरील खोट्या बातम्या ही गोष्ट आजकाल सर्वच ठिकाणी सर्रास सुरू आहे. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सरकार वापरकर्त्याच्या चॅटवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हाॅट्अॅपकरता नवीन मार्गदर्शन तत्वे जारी करण्यात आले असल्याचा दावा या व्हायरल होत असणाऱ्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.


मात्र सरकारला कोणताही संदेश संशयास्पद वाटल्यास पाठवणाऱ्यावर कारवाई केली जाईल. तर व्हॉट्सअ‍ॅपच्या नियमांमध्ये असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) अजूनही युजर्सची प्रायव्हसी जपत आहे. अशा निराधार गोष्टींमध्ये तथ्य नाही. मात्र या व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे की, तुमच्या मेसेजवर तीन ब्लू टिक आल्या तर त्या मेसेजवर सरकारद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. पीआयबीनुसार, व्हायरल मेसेजचा दावा खोटा आहे असे सांगण्यात आले आहे. 


व्हायरल मेसेजमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, एकच चेक आणि टिक म्हणजे मेसेज यशस्वीरित्या पाठवला गेला आहे. डबल टिक म्हणजे संदेश वितरित झाला आहे. तर ब्लू टिक म्हणजे संदेश वाचला गेला आहे. हे फिचर अगदी सुरुवातीपासूनच वापरात आहे.


सत्य काय...


व्हायरल मेसेजमध्ये एक खोटा दावा करण्यात आला आहे, ज्यामध्ये तीन ब्लू टिक्सचा उल्लेख करण्यात आला आहे. मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे की, तीन टिक्स म्हणजे सरकार तुमच्या चॅटवर नजर ठेवत आहे. यामध्ये दोन निळ्या टिक आणि एक लाल टिक म्हणजे वापरकर्त्यावर कारवाई करण्यात आली आहे. 'एक निळी आणि दोन लाल टिक' म्हणजे सरकार वापरकर्त्यांचा डेटा तपासत आहे. तीन लाल टिक म्हणजे आता वापरकर्त्यांवर कारवाई केली जाईल.






व्हायरल होणारा मेसेज पूर्णपणे खोटा


PBI ने सांगितले आहे की, हे मेसेज खोटे असून सामान्य जनतेने अशा मेसेजकडे दूर्लक्ष करावे. याबाबत सरकारने कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. गेल्या वर्षी पसरलेल्या खोट्या बातम्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social Media) एका ट्विस्टसह व्हायरल होत आहेत. या अॅपमध्ये एंड-टू-एंड एनक्रिप्टेड सुविधा उपलब्ध असल्याचे मेटाने सांगितले आहे. यामुळे मेसेज पाठवणारा आणि घेणारा यांच्याशिवाय तिसरी व्यक्ती मेसेज वाचू शकत नाही.


 


इतर महत्वाच्या बातम्या