Viral Video: ट्रेन प्रवासादरम्यान नेहमीच लोकांना अनाऊन्समेंटद्वारे (Train Announcement) विविध सूचना दिल्या जातात. लोकांनी आपला जीव धोक्यात टाकू नये म्हणून त्यांना वारंवार सतर्क केलं जातं. चालत्या गाडीतून बाहेर डोकावणं धोक्याचं आहे, ट्रेनमध्ये (Train) चढताना किंवा उतरताना पायदान आणि फलाटामधील (Platform) अंतरावर लक्ष द्या, जलद गाडी जात असताना प्लॅटफॉर्मपासून दूर उभे राहा, अशा विविध सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र या सर्व सूचनांना प्रवासी सर्रास धुडकावून लावतात आणि नको नको ते प्रताप करतात. अनेकदा याच कारणामुळे लोक अपघातांना (Accident) बळी पडतात.


आता हे सर्व झालं भारतातील रेल्वे प्रवासाबद्दल. पण जगातही हे असे प्रकार सर्रास घडतात, तिथेही काही भारतासारखे अवलिया असतात, जे विविध प्रकारची स्टंटबाजी करुन समोरच्यालाही घाबरवून सोडतात. आता असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील (America) न्यू यॉर्क शहरात घडला आहे. न्यू यॉर्कमधील (New York) एक तरुण धावत्या ट्रेनच्या छतावर चढून स्टंटबाजी करत होता, त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


चालत्या लोकलच्या छतावर तरुणाची स्टंटबाजी


'न्यूयॉर्क ओन्ली' नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ट्रेनच्या छतावर चढून प्रवास करणारा हा मुलगा शाळेत शिकत असणारा वाटत आहे, जो ट्रेनच्या छतावर बेधडक उभा आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर हा मुलगा एखाद्या व्हिडीओ गेमचा (Game) भाग असल्यासारखंच वाटतं. सुरुवातीला हा मुलगा फक्त उभा आहे, पण काही वेळानंतर तो अक्षरश: ट्रेनवर उभा राहून उलट दिशेने धावत आहे.






भरधाव वेगात होती ट्रेन


न्यू यॉर्कच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रेनवर हा मुलगा चढला आहे. या मुलाने हुडी आणि जीन्स घातली असून त्याच्या पाठीवर बॅग लटकलेली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका क्षणी मुलगा अडखळल्याचंही दिसत आहे. याच वेळी स्टेशनवर लोकांचा जमाव उभा आहे, जो थक्क होऊन भरधाव वेगात जाणऱ्या ट्रेनवर उभ्या असलेल्या या मुलाकडे पाहत आहे. गर्दी त्या मुलाकडे बघते आणि स्टेशनवर एकच गोंधळ उडतो. या दरम्यान, मुलगा देखील मागे वळून अडखळतो, परंतु पडण्याऐवजी तो छतावर स्थिर उभा राहून स्वत:ला सांभाळतो.


हेही वाचा:


VIDEO: बसच्या सीट गडद रंगाच्या का असतात? कारण समजलं तर त्यावर बसणं देखील बंद कराल