Trending News: अमेरिकेतील (America) शिकागो शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 आणि 5 ऑक्टोबरला शिकागोमध्ये (Chicago) हजारो पक्षी आढळून आले. पण त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी कमीत कमी 1,000 पक्षी रस्त्यांवर मृतावस्थेत (Birds Died In Chicago) पडलेले आढळून आले. हे पाहून परिसरातील लोक देखील हैराण झाले.


टेनेसी वार्बलर्स, हर्मिट थ्रश, अमेरिकन वुडकॉक यांच्यासह अनेक प्रजातींचे पक्षी (Birds) जमिनीवर मृतावस्थेत आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. नेमका इतक्या सर्व पक्षांचा एकाच वेळी मृत्यू कसा झाला? या विचाराने बहुतेक लोक चिंताग्रस्त झाले.


पक्ष्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय?


असं म्हटलं जात आहे की, एका उंच काचेच्या इमारतीला आदळून जखमी झाल्यानंतर हे पक्षी जमिनीवर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात, म्हणजेच 4 आणि 5 ऑक्टोबरला कुक काउंटीमध्ये किमान 15 लाख पक्षी नजरेस पडले. सोशल मीडियावर काही लोकांनी म्हटलं की, पारदर्शक काचेच्या इमारतीला धडकल्याने या पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या पक्ष्यांच्या मृतदेहांच्या ढिगाऱ्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच लोक हैराण झाले आहेत. कोणीतरी गालिचा पसरल्याप्रमाणे या पक्ष्यांचे मृतदेह रस्त्यावर विखुरले होते.


पक्ष्यांचा शोध अद्याप सुरू


मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष्यांचे अवशेष गोळा करण्याचं काम अद्यापही सुरुच आहे. पक्ष्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं अजून बाकी आहे. बरेच पक्षी अजून सापडलेले नाहीत. पक्ष्यांचे अवशेष शोधण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑन्टारियोचे संशोधक ब्रेंडन सॅम्युअल्स म्हणाले की, इमारतीच्या काचेला आदळून इतक्या मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकत नाही.


या घटनेत नेमक्या किती पक्षांचा मृत्यू झाला याचा नेमका आकडा काही दिवसांत कळेल, असंही ते म्हणाले. कारण आजही आजूबाजूच्या परिसरात विखुरलेले पक्ष्यांचे मृतदेह गोळा करण्याचं काम स्वयंसेवक करत आहेत.


कोणत्या कारणांमुळे होतो पक्ष्यांचा मृत्यू?


स्थलांतरावेळी बऱ्याच पक्ष्यांचा वेगवेगळ्या कारणामुळे मृत्यू होतो. विरुद्ध दिशेला वाहणारा वारा, धुके, पाऊस, प्रदूषण आदी अनेक गोष्टी पक्ष्यांसाठी कधी कधी खूप आव्हानात्मक ठरतात आणि अशा कारणांमुळे मोठ्या संख्येने पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. सर्व परिस्थितीचा सामना करुन जगणं पक्ष्यांसाठी अवघड असतं.


हेही वाचा:


Facts: इकडे एक सांभाळता येईना, तिकडे दोन लग्नाची अट; 'या' देशात दोन लग्न करणं बंधनकारक, अन्यथा जन्मठेप