Viral Love Story Trending News : असे म्हणतात की, प्रेमाला (Love Story) वय नसते, सीमा नसते, बंधन नसते. कोणी कधीही कोणाच्याही प्रेमात पडू शकतो. म्हणूनच आजकाल विविध देशात राहणारी मुलं-मुलीही एकमेकांशी अगदी सहज लग्न करताना दिसत आहेत. अशा सर्व प्रकारच्या प्रेमकथा अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल व्हिडीओ (Viral Video) होतात, ज्यामुळे लोक आश्चर्यचकितही होतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्रेमकथेचा बोलबाला आहे. ही कथा एक शिक्षक आणि त्याच्या विद्यार्थीनीची आहे, जे आधी प्रेमात पडतात आणि नंतर लग्न करतात.


नवरा 60 वर्षांचा, तर नवरी 29; आधी प्रेम मग लग्न
विशेष म्हणजे शिक्षकाचे वय 60 च्या जवळपास आहे, तर विद्यार्थीनीचे वय 29 वर्षे आहे. हे दोघंही शिक्षक आणि विद्यार्थी कोणत्याही शाळेचे किंवा महाविद्यालयाचे नसून दोघेही संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत. संगीत शिकत असतानाच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर मग त्यांचे प्रेम इतके खुलत गेले की, जग काय म्हणेल? याची पर्वा न करता त्यांनी लग्न केलं.


 


 



शिक्षक-विद्यार्थीनीची प्रेमकहाणी व्हायरल!


एका खासगी यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही मुलाखत घेण्यात आली आहे. ही संपूर्ण मुलाखत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर शेअर केली आहे. एकूण 14 मिनिटे 25 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 60 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.



संगीत, प्रेम आणि नंतर लग्न
मुलाखतीदरम्यान, 60 वर्षीय शिक्षकाने आपले नाव गुलाम अली असल्याचे सांगितले, तर त्यांची विद्यार्थिनी म्हणजेच पत्नीने तिचे नाव दिलनशीन असल्याचे सांगितले. दिलनशीनने पुढे सांगितले की, तिला गाण्याची खूप आवड होती. ती गुलाम अली यांच्याकडून संगीत शिकायची. तर शिक्षक गुलाम अली यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून सध्या ते एकटेच राहत होतो. यादरम्यान, दिलनशीन त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारत असे,  त्याच वेळी त्या दोघांमध्ये जवळीक वाढली, आणि एकमेकांवर प्रेम जडले. त्यानंतर गुलाम अलींनी सांगितले की दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे आणि दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे आहे. मग एक वेळ अशी आली जेव्हा दोघे एकत्र आले, आणि त्यांचे लग्न झाले.


महत्वाच्या बातम्या : 


Viral Video : श्वानाने केली गणपतीची मनोभावे पूजा, मंदिराबाहेर असे काही केले, व्हिडीओने जिंकली लोकांची मने