Trending News : सुमारे 200 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजामध्ये खजिना सापडला आहे. ब्रिटीशांनी 1708 सॅन जोस जहाज 600 प्रवाशी असलेलं जहाज बुडवलं होतं. सुमारे 200 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजात आता सोनं आणि मौल्यवान वस्तू असल्याचं समोर आलं आहे. स्पेन सरकारने या समुद्रातील बुडालेल्या या जहाजांच्या अवशेषांचा नवी व्हिडीओ शेअर केला आहे. या जहाजामध्ये मौल्यवान वस्तूंसह सोनं सापडलं आहे. 2015 मध्ये या येथे दोन जहाजांचे अवशेष सापडले. स्पेन सरकारनं या जहाजाच्या अवशेषांमध्ये शोधकार्य सुरु केलं. रिमोट कंट्रोलद्वारे कॅमेरा खोल समुद्रात पाठवला. आता त्याचं फुटेज समोर आलं आहे.


एका रिपोर्टनुसार, हे जहाज 200 वर्षांपूर्वीचं आहे. देशाच्या कॅरेबियन किनार्‍यावजवळ 3100 फूट खोलं या जहाजाचे अवशेष आहेत. या व्हिडीओमध्ये समुद्राच्या तळावर जहाजावरील सोन्याची नाणी, निळ्या आणि हिरव्या रंगातील पोर्सिलेन कप दिसत आहेत. 2015 मध्ये बुडालेल्या सॅन जोस जहाजाजवळ दोन जहाजांचे अवशेष सापडले होते. आता या जहाजांवर 17 अब्ज किमतीचे सोनं असल्याचं समोर आलं आहे. 1708 मध्ये ब्रिटीशांनी 62 तोफा असलेलं सॅन जोस जहाज बुडवलं होतं. व्हिडीओमध्ये जहाजाच्या अवशेषात सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू दिसत आहेत.






सॅन जोस हे 62 तोफा असलेलं तीन शिडांचे मोठं लढाऊ जहाज होतं. 1708 मध्ये स्पॅनिश उत्तराधिकाराच्या युद्धात (1701-1714) ब्रिटिशांनी या जहाजासह 600 लोकांना बुडवलं. या जहाजाचे अवशेष 2015 मध्ये सापडले होते. हे जहाज सोने आणि मौल्यवान वस्तूंनी भरलेलं आहे. याची किंमत अब्जावधी डॉलर्स असल्याचं सांगितलं जातं आहे. रिमोट कंट्रोल कॅमेऱ्याद्वारे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये समुद्राच्या तळावरील जहाज दिसत आहे, जे अद्याप वाळूमध्ये बुडलेलं नाही.


व्हिडीओमध्ये तोफांच्या जवळ वाळूवर काही सोन्याची नाणी पडलेली दिसत आहे. तर त्यानंतरच्या व्हिडीओमध्ये अनेक कलाकृती, चहाचे कप आणि इतर मौल्यवान वस्तू दिसत आहेत. 2015 मध्ये कोलंबियाचे अध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी दोन जहाज शोधण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, सॅन जोसच्या ढिगाऱ्याजवळ दोन जहाजे सापडली होती. ही जहाज ब्रिटिशांनी 18 व्या शतकात कोलंबियातील कार्टेजेना डी इंडियाज बंदराजवळ बुडवली होती. 


सॅन जोसच्या जहाजाच्या अवशेषांना जहाजाच्या दुर्घटनेची 'पवित्र कबर' म्हटलं जातं कारण ती समुद्रात बुडालेल्या सर्वात मौल्यवान वस्तूंपैकी एक होती.