Bride Marriage Entry Video : विवाहसोहळ्यांमध्ये नवरीची एंट्री भव्य असणे सामान्य आहे. पण आता काळ बदलला आहे. सध्या नववधूंच्या ग्रॅंड एंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंडपापर्यंत नववधूंचा प्रवेश वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अशाच एका नववधूची एन्ट्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 


बोटीवर नवरीची एंट्री, प्रत्येकाच्या नजरा फक्त वधूवर खिळल्या
सोशल मीडियावर व्हायरल झाली या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधूची एंट्री तिने एका बोटीने केली आहे. नववधू सजवलेल्या होडीत बसली आहे आणि बोट खूप छान सजवली आहे. बोटीभोवती फुलांची सजावट केली आहे. पाण्यात धुक्यापासून ढग तयार होत आहेत. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या नजरा फक्त वधूवर खिळल्या. 


सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल
वधूच्या ग्रॅंड एन्ट्रीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ weddingvows.in ने शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओला 2.9 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर जवळपास 70 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. 


नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
नववधूच्या ग्रँड एन्ट्रीचा व्हिडिओ लोकांना खूप आवडतोय. हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करण्यासोबतच नेटकरी यावर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'हे खूप सुंदर आहे.' त्याचवेळी, आणखी एका युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, तिला स्वतःच्या लग्नातही अशीच एन्ट्री हवी आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले, 'प्यार की कश्ती.' असं म्हटलंय.


महत्त्वाच्या इतर बातम्या