Buckingham Palace : ब्रिटनचे (Britain) राजघराणे (Royal Family) अनेकदा चर्चेत असतेच पण लोकांना त्यांच्या राजवाड्याबद्दल बकिंगहॅम पॅलेसबाबतही (Buckingham Palace) खास आकर्षण वाटते. वृत्तानुसार, ब्रिटीश राजघराण्याचे निवासस्थान असलेलं बकिंघम पॅलेस हे जगातील सर्वात महागडं घर आहे. आता या महालाबाबतचा एक अभ्यास समोर आला आहे. ब्रिटनच्या राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान असलेले बकिंगहॅम पॅलेस खरेदी करताना किंवा भाड्याने देताना तुमचा खिशाला किती झळ बसेल याचा अंदाज या अहवालावरून तुम्हांला येईल.
बकिंगहॅम पॅलेस ही ब्रिटिश राजघराण्याची निवासी मालमत्ता आहे. हा राजवाडा विक्रीसाठी आणि भाड्याने देण्यासाठी उपलब्ध नाही. दरम्यान, या संदर्भातील एक अभ्यास समोर आला आहे. 'मॅककार्थी स्टोन'च्या (McCarthy Stone) अभ्यासानुसार, 775 खोल्या असलेलं बकिंगहॅम पॅलेस खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.3 अब्ज पौंड खर्च येईल. यामध्ये कोरोना महामारीपूर्वीच्या किमतीच्या तुलनेत 100 दशलक्ष पौंडची वाढ झाली आहे.
रिटायरमेंट प्रॉपर्टी डेव्हलपर्सच्या अंदाजानुसार, 2022 मध्ये ब्रिटनच्या शाही मालमत्तेची एकूण किंमत 3.7 अब्ज पौंडपर्यंत पोहोचेल. यामध्ये 2019 नंतर 46 दशलक्ष पौंड इतकी वाढ झाली आहे. ब्रिटनच्या शाही संपत्तीमध्ये देशभरातील राजवाडे आणि विश्रामगृहांचा समावेश आहे. या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, जर राजघराण्याला बकिंगहॅम पॅलेस भाड्यानं द्यायचा असेल तर त्याचं भाडं दरमहा 2.6 दशलक्ष पौंड असू शकतं. ही किंमती मालमत्तेचा आकार, खोल्यांची संख्या आणि स्थान यावर आधारित आहेत.
अभ्यासासाठी पुनरावलोकन केलेल्या मालमत्तांपैकी कोणतीही मालमत्ता विक्रीसाठी किंवा भाड्यानं उपलब्ध नाही. राजेशाही मालमत्ता ही हाऊस ऑफ विंडसरची वैयक्तिक मालमत्ता नाही. ही ब्रिटनची मालमत्ता आहे, ही ट्रस्ट अंतर्गत येते. लवकरच ब्रिटनमध्ये राणीचा 70 वा वाढदिवस (Platinum Jubilee) साजरा करण्यात येणार असून त्याची तयारी सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या