Trending Domino’s Pizza News : ऑनलाइन फूड डिलीव्हरीमध्ये (Online Food Delivery) पिझ्झा (Pizza) खूप लोकप्रिय आहे. पिझ्झाचे शौकीन ऑनलाइन ऑर्डर करून पिझ्झा आवडीने खातात. मात्र काही वेळा त्यांना निराशेला सामोरे जावे लागते. असेच एक प्रकरण मुंबईत समोर आले आहे, जिथे एका व्यक्तीने डॉमिनोजकडून (Domino’s Pizza)ऑनलाइन ऑर्डर करून पिझ्झा मागवला होता, पण तो उघडला असता त्यात काही काचेचे तुकडे बाहेर आल्याने तो आश्चर्यचकित झाला.
ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये काचेचे तुकडे!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना मुंबईतील आहे. ट्विटरवर अरुण कोल्लुरी नावाच्या व्यक्तीने पिझ्झा आउटलेटद्वारे विकल्या जाणार्या पिझ्झाचे छायाचित्र पोस्ट केले आणि सांगितले की ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये काचेचे तुकडे सापडले. त्याच्या ट्विटमध्ये आउटलेट किंवा वितरणाच्या तारखेचा उल्लेख नाही. या ट्विटद्वारे त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केले.
मुंबई पोलिसांनी 'या' ट्वीटवर प्रतिक्रिया दिली,
इतकेच नाही तर त्याने मुंबई पोलिसांसह भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाला टॅग केले आणि लिहिले की डॉमिनोमध्ये काचेचे 2 ते 3 तुकडे सापडले आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनी या ट्वीटवर पुन्हा उत्तर दिले की, कोणताही कायदेशीर उपाय शोधण्यापूर्वी डॉमिनोच्या कस्टमर केअरला लिहिण्याचा सल्ला देण्यात येत आहे
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश
सध्या या प्रकरणावर डॉमिनोचे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले की, त्यांच्या टीमने पिझ्झा आउटलेट तपासले, परंतु कोणताही दोष आढळला नाही. सध्या या प्रकरणातील तथ्य जाणून घेण्यासाठी कंपनीने पीडित ग्राहकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला आहे. सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Viral Video: 'आइए आपका इंतजार था...'; चक्क कपाळावर टिळा लावून केलं फूड डिलिव्हरी बॉयचं स्वागत, व्हिडीओ व्हायरल'
- पुण्यातील धक्कादायक घटना, झोमॅटो बॉयकडून तरुणीचा विनयभंग, जबरदस्तीनं घेतलं चुंबन