Viral Contract Marriage : भारतातील अनेक जोडप्यांनी  (Indian Couple) आपल्या विवाहादरम्यान परंपरा आणि रूढींना तोडून नवीन परंपरांना जन्म दिला आहे. त्यांनी तयार केलेल्या या परंपरा इतक्या अनोख्या आहेत की, त्या ऑनलाइन युझर्सचे लक्ष वेधून घेतात. अशाच एका लग्नात आसामच्या (Assam) शांती आणि मिंटू या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा एक करार (Contract) केला, त्यावर दोघांनी स्वाक्षरी केली, ज्यामध्ये दोघांनी काय करावे आणि काय करू नये हे एका यादीत सांगितले आहे.


वधू-वराची एका अनोख्या करारावर स्वाक्षरी


वेडलॉक फोटोग्राफी आसामकडून त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या क्लिपमध्ये वधूने लाल लेहेंगा घातलेला आहे, तर वधू-वर मिळून एका करारावर स्वाक्षरी करताना दाखवले आहे. कागदावर छापलेल्या मोठ्या कार्डासारख्या करारावर सह्या केल्याने हे जोडपे खूप आनंदी दिसत आहेत.






 


लग्नाच्या करारामध्ये नेमक्या अटी काय?


लग्नाच्या करारानुसार, "वधूने रोज साडी नेसावी." तसेच‘रविवार सकाळचा नाश्ता तू बनवशील’असेही या यादीत म्हटले आहे. तर उल्लेखनीय बाब म्हणजे आठवडय़ातील इतर दिवशी कोण जेवण शिजवणार? याचा उल्लेख नाही केला. यादीत असेही लिहिले आहे की, ‘घरच्या जेवणाला नेहमी हो म्हटलंच पाहिजे,’ या यादीत आणखी काय लिहलंय ते जाणून घ्या. कराराच्या इतर अटींमध्ये महिन्यात फक्त एक वेळा पिझ्झा खाणे, दररोज जिममध्ये जाणे, दर 15 दिवसांनी शॉपिंग करणे आणि प्रत्येक पार्टीमध्ये चांगले फोटो क्लिक करणे या गोष्टींचा समावेश आहे.




 


महत्त्वाच्या इतर बातम्या