Dangerous Stunt : आजकाल लोकांना काहीना काही रोमांचक करायची इच्छा असते.  अ‍ॅडव्हेंचरस गोष्टी करण्यामध्ये काहींचा रस असतो. अशा रोमांचक आणि चित्तथरारक स्टंटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. काही अनोखे आणि विचित्र स्टंट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. नुकताच एक स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शेकडो फूट उंचीवर स्टंट करताना तोल गेल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण रोमांचक स्टंट करताना दिसत आहे. हा तरुण आकाशात शेकडो फूट उंचीवर स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पॅराशूटला दोरी बांधलेली दिसत आहे. एक तरुण उंच आकाशात दोरीवर चालताना दिसत आहे. यावेळी हा तोल सांभाळत दोरीवर एका टोकावरून दुसऱ्या टोकावर चालत जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 






 


दोरीवर चालताना तरुणाचा गेला तोल
हा व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोरीवरून चालण्याचा प्रयत्न करताना या तरुणाचा तोल जातो आणि तो दोरीवरून खाली पडतो. हे दृश्य अक्षरश: काळजाचा ठोका चुकवणारं असल्याचं व्हिडीओ पाहिल्यावरच तुम्हाला कळेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडीओ Earthpix नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 


व्यक्तीने घातलं होतं पॅराशूट
दोरीवरून तोल सांभाळून चालताना व्यक्तीचा तोल जाऊन तो उंचीवरून खाली कोसळला. यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, त्या व्यक्तीचं पुढे काय झालं. तर या व्यक्तीने हा स्टंट करताना पॅराशूट घातलं होतं. त्यामुळे तो सुखरुप आहे. दरम्यान या व्हिडीओला नेटकरी लाईक्स आणि शेअर करत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या