Unique Hotels In India : फिरायला जाताना आपण चांगलं हॉटेल शोधतो. अशा वेळी अनेकांना बाहेरचं सुंदर दृश्य दिसणाऱ्या हॉटेलमध्ये (Hotel) राहणं नक्कीच आवडतं. बरेच लोक हॉटेल रूममधून चांगला व्ह्यू दिसण्यासाठी अधिक पैसे देण्यासही तयार असतात. भारतातही अशीच काही हॉटेल्स आहे, जी स्वतःमध्येच खूप खास आहेत. या हॉटेल्समध्ये गेल्यावर तुम्हाला परदेशात गेल्यासारखं वाटेल.


किल्ला बिशनगड हॉटेल


जर तुम्ही जयपूरला गेलात तर तुम्हाला अनेक हॉटेल्स पाहायला मिळतील जी खूप खास आहेत. यातीलच एक म्हणजे किल्ला बिशनगड हॉटेल. हे हॉटेल पूर्वी किल्ला होता, जो राजे-महाराजांकडून युद्धाच्या काळात वापरला जात असे. या किल्ल्याचं नंतर हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आलं. बिशनगड हॉटेलमध्ये जुने बुरुज, तळघर, हॉल, अंधारकोठडी यासारख्या गोष्टी पाहायला मिळतील. त्यात पूल, प्रायव्हेट लाउंज, बार आणि स्पा यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे.


शेरलॉक हॉटेल


जर तुम्ही ऊटीला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला शेरलॉक हॉटेलचा अनुभव नक्की घ्या. हे थीमवर आधारित हॉटेल आहे आणि या हॉटेलमधील प्रत्येक गोष्ट तुम्हाला 1800 च्या काळातील लंडनमध्ये गेल्याचा अनुभव येईल.


री किंझाई हॉटेल


मेघालयमधील री किंझाई हॉटेल अत्यंत युनिक आहे. री भोई जिल्ह्यात स्थित री किंझाई हॉटेल संस्कृती आणि परंपरेचा उत्तम नमुना आहे. जर तुम्ही मेघालयला पहिल्यांदा भेट देत असाल, तर हा हॉटेल उत्तम पर्याय ठरेल. रिसॉर्टमध्ये पारंपारिक खासी शैलीत बांधलेले कॉटेज आहेत आणि खोल्यांमधून तलावाची सुंदर दृश्यं पाहायला मिळतात. हे हॉटेल पारंपारिक आणि लक्झरी लाईफ यांचं सुंदर संगम आहे.


बांधवगड ट्री हाऊस


बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील ट्री हाऊस हा जंगलाचा अनुभव घेण्याचा सर्वात मजेदार मार्ग आहे. जंगली प्राण्यांपासून दूर, पण निसर्गाच्या कुशीत या ट्रीहाऊसमध्ये राहण्यासाठी आरामदायक खोल्या आहेत. मोठ-मोठी झाडे आणि हिरव्यागार जंगलाने वेढलेल्या 21 एकर जागेत एकूण पाच ट्रीहाऊस आहेत. जंगलात राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पळून जावे लागेल, सर्व ट्री हाऊस तुम्हाला आरामदायी बनवण्यासाठी उत्तम सुविधांसह येतात.


उरावू हॉटेल


उरावू हॉटेलमध्ये तुम्हाला पारंपारिक इको-फ्रेंडली बांबूच्या झोपड्यांसारख्या खोल्या पाहायला मिळतील. वायनाडमध्ये वसलेले आणि निसर्गाच्या अगदी जवळ असलेले, उरावू हे एक जंगलात शांततेत वेळ घालवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.


हे ही वाचा :


Pirates Black Patch : समुद्री डाकू म्हणजेच पायरेट्स एका डोळ्यांवर पट्टी का बांधतात? यामागचं कारण माहितीय?