Pirates Black Patch : समुद्री चाचे किंवा समुद्री डाकू म्हणजे 'पायरेट्स' बाबत आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. समुद्री लुटारुंच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. समुद्री लुटारु साधारण लुटारूंपेक्षा काही वेगळे दिसतात. त्यांचं राहणीमान आणि वेश पूर्णपणे वेगळा असतो. समुद्री लुटारुंच्या एका डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली असते. अनेक कथा आणि चित्रपटांमध्ये सुद्धा तुम्ही हे पाहिलं असेल. पण, ही पट्टी का असते, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? समुद्री लुटारुंच्या एका डोळ्यावर पट्टी बांधण्यामागेही खास कारण आहे.


समुद्री चाचे म्हणजे समुद्रात लुटालूट करणारे लुटारू. समुद्री चाचे समुद्रातील जहाजे किंवा इतर होड्या अडवून त्यावरील लोकांकडून मौल्यवान वस्तू, सोने-नाणे यांची लुटमार करतात. कधी-कधी समुद्री चाचे जहाजे आणि त्यावरील लोकांना ओलीस ठेवून संबंधित देशाकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्याचाही प्रयत्न करतात.


समुद्री चाचे एका डोळ्यांवर पट्टी का बांधतात? 


समुद्री लुटारूंचा वेश वेगळा असतो. त्यांच्या एक डोळा उघडा असतो, तर एका डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधलेली असते. काही लोकांना वाटत असेल की, त्यांचा एक डोळा निकामी झाल्यामुळे ते डोळा लपवण्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधतात. तर काही जण असा विचार करत असतील की, हा त्यांचा ड्रेसकोड आहे, तर येथे तुम्ही चुकताय. यामागे वैज्ञानिक कारण आहे. हे तुम्हाला माहितीय का? नसेल तर आम्ही तुम्हाला आज यामागचं कारण सांगणार आहोत.


यामागचं कारण माहितीय?


समुद्री लुटारू एका डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यामागचं कारण म्हणजे अंधारात चांगल्याप्रकारे पाहण्यासाठी करतात. समुद्री लुटारूंना अंधारात आणि प्रकाशात सक्रिय राहावं लागतं. कोणत्याही चोरीच्या वेळी त्यांना जहाजातही अनेक वातावरणाचा सामना करावा लागतो. यावेळी कधी लख्ख प्रकाश असतो तर कधी अंधार असतो. यामुळे, त्यांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते, यामुळे ते त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधतात.अशावेळी रात्रीच्या अंधारात आणि दिवसा उजेडात स्पष्टपणे दिसावं, यासाठी ही पट्टी वापरतात. आता यामागचं वैज्ञानिक कारण काय ते पाहा.


स्पष्ट दिसण्यासाठी कसा होतो उपयोग?


सामान्य डोळ्याला आपल्या तेजस्वी प्रकाशापासून अंधारात किंवा अंधारातून प्रकाशात व्यवस्थित जुळवून घेण्यासाठी बराच वेळ लागतो. या संपूर्ण प्रक्रियेस 25 मिनिटं लागतात. पण समुद्री लुटारुंना कायमच धोका असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत लवकर जुळवून घेण्यासाठी म्हणूनच समुद्री चाच्यांनी नेहमी एका डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली होती जेणेकरून ते आधीच जुळले जातील, असं सांगितलं जातं. यामुळे दोन्ही डोळे लवकर प्रकाशाशी आणि अंधाराशी लवकर जुळवून घेतात.