Trending News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता भारत देशासह अनेक देशामध्ये दिसून येते. त्यामुळे परदेशात फिरताना तिथे राहणारे लोक मोदींचे स्वागत करताना दिसतात. क्वाड समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पीएम मोदी जपानची राजधानी टोकियो येथे दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. यावेळी तिथल्या जपानी लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होतोय. 


पीएम मोदी खूपच भारावले 


पंतप्रधान मोदी टोकियोला पोहोचताच जपानच्या नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर टोकियोच्या हॉटेलमधील भारतीय प्रवासी तसेच जपानी नागरिकांनी स्वागत केले. यावेळी, भारताचा राष्ट्रध्वज फडकावून, पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्याबरोबरच लोकांनी त्यांचे संदेश लिहिलेले फलकही दाखवले. यामुळे पीएम मोदी खूपच भारावले होते.


 


 




यादरम्यान एका जपानी मुलाने हिंदी बोलून सर्वांचे लक्ष वेधून घेतले, जो पंतप्रधान मोदींना हिंदीत म्हणाला, 'जपानमध्ये तुमचे खूप स्वागत आहे.' ते पाहून प्रभावित होऊन पीएम मोदींनी त्यांना विचारले, 'तुम्ही हिंदी कुठून शिकलात? तुला ते चांगलं माहीत आहे?' त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याचा एक भाग खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.


क्वाड लीडर्स समिटमध्ये विविध विषयांवर चर्चा


क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. पीएम मोदींची ही दुसरी वैयक्तिक क्वाड समिट आहे. सध्या, आज पीएम मोदी टोकियोमध्ये क्वाड नेत्यांसोबत शिखर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज चर्चा करणार आहेत.