Trending IQ Test : तुम्हाला जर तुमचा IQ टेस्ट करायचा असेल तर आजकाल अनेकजण ऑप्टिकल इल्युजनचा (Optical Illusion) वापर करतात. सोशल मीडियावर सध्या हेच ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्यूजनमुळे दोन गोष्टी सहज साध्य होतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनोरंजदेखील होते.
ऑप्टिकल इल्यूजन सामान्यतः अशी चित्रे असतात जी लोकांना खिळवून ठेवतात. मेंदूला चालना देतात. यामध्ये अनेक आकार बदलणाऱ्या प्रतिमा असतात. या प्रतिमा तुमच्या मेंदूला एक प्रकारे चॅलेंज देतात. तसेच, वेळोवेळी असे कोडे समोर आल्याने तुमचा मेंदूही अॅक्टिव्ह राहतो. आणि तुमचं मनही निरोगी राहतं.
व्हायरल होत असलेल्या या चित्रात दिलेल्या कोड्यामध्ये तुम्हाला जंगलात लपलेला चित्ता (Jaguar) शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. या चित्रात अनेक वाघ विश्रांती घेताना दिसतायत. सरासरीपेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेले लोक 9 सेकंदात पहिल्या चित्रात जाऊन चित्रात लपलेला चित्ता शोधू शकतात.
ऑप्टिकल इल्युजनमध्ये, आपण पाहू शकता की वाघांचा एक समूह जंगलात विश्रांती घेत आहे. परंतु, त्यांच्यामध्ये एक चित्तादेखील आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. चित्रात लपलेला चित्ता जर तुम्ही 9 सेकंदाच्या आत शोधला असेल तर तुमचं अभिनंदन. पण, जे अजूनही चित्ता शोधण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी खालच्या फोटोमध्ये उत्तर दिलं आहे.
या चित्रात जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की, या वाघांमध्येच चित्ता लपलेला आहे. खरंतर, चित्ता शोधणं जरा कठीण आहे, परंतु जर तुम्ही चित्राचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला कळेल की वाघांच्या डावीकडे चित्ता लपलेला आहे. या चित्रातून एक गोष्ट सरळ स्पष्ट होते की, वाघांच्या शरीरावर उभ्या काळ्या रंगाच्या पट्ट्या असतात तर चित्ताच्या शरीरावर ठिपके असतात ज्यांना रोझेट्स असेही म्हणतात. अनेकांचा वाघ आणि चित्ता ओळखण्यात फार गोंधळ होतो. अशा लोकांना हे चित्र पाहून बोध मिळाला असेल.
सोशल मीडियावर असे अनेक संभ्रमात टाकणारे, बुद्धीला चालना देणारे, टेस्ट करणारे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. या फोटोतून खरंतर आपल्या बुद्धीला चालनादेखील मिळते आणि तुमचं मनोरंजन देखील होतं.
महत्त्वाच्या बातम्या :