Solar Halo: प्रयागराज सोबतच उत्तर भारतातील बरीच राज्य आज एका सुंदर अशा खगोलीय घटनेचे साक्षीदार झाले आहेत. तळपत्या सूर्याला गोलाकर 'वलय' आल्याचं आज उत्तर भारतीयांनी अनुभवलं. तसेच लोकांनी याचे फोटो काढून सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात शेअर केले. पण सूर्याभोवती हे वलय कसं येतं हा प्रश्न तसाचं राहतो. चला तर मग जाणून घेऊया या सूर्याभोवतीच्या या 'वलया'बद्दल. 


सूर्याभोवती हे वलय कधी आणि का येतं? 


सूर्याभोवती या वलय येण्याच्या प्रक्रियेस मराठीत सूर्याभोवतीचे प्रभामंडळ असे म्हणतात. शुक्रवारी सकाळी उत्तर भारतात हे सूर्याभोवतीचे वलय पहायला मिळाले. ही एक साधरण खगोलीय घटना आहे ज्याला भौगोलिक भाषेत 'सोलार हेलो' म्हटले जाते. जेव्हा सूर्य पृथ्वीच्या 22 अंशात असतो, त्यावेळी आकाशात 20 हजार फुटांवर सिरस क्लाऊडमुळे (आर्द्रता असलेले असे ढग ज्यांचा थर अतिशय पातळ असतो) हे गोलाकार कडं बनतं. बऱ्याचदा या वलयात इंद्रधनुष्याचे सप्तरंग देखील आढळून येतात. सूर्य किंवा चंद्राची किरणे सिरस ढगांमध्ये असलेल्या हेक्सागोनल बर्फाच्या कणांच्या माध्यमातून परावर्तित होऊन हे वलय तयार होते. 


चंद्राभोवतीदेखील येतं असं वलय..


चंद्राभोवती देखील असंच वलय येत आणि याला 'हेलो ऑफ मून' म्हटलं जातं. काही लोकं याला 'मून रिंग' देखील म्हणतात. 20 फेब्रुवारी 2020 ला चंद्राभोवती हे वलय आलं होतं. योगायोगाने तेव्हा देखील शुक्रवार होता. 


अशाच प्रकारची एक घटना 20 जुलै 2015 रोजी उत्तराखंड राज्यात घडली होती. हल्व्दानी जवळ 20 जुलैच्या सकाळी लोकांना सूर्याभोवती असंच गोलाकार वलय पहायला मिळालं होतं. या वलायात देखील सप्तरंग पहायला मिळाले होते. ही घटना जेव्हा घडली त्या दिवशी रविवार होता. 


हेलो कशाला म्हणतात? 


जेव्हा उर्जेने भरलेल्या एखाद्या गोष्टीभोवती गोलाकार रिंगण तयार होतं तेव्हा त्याला हेलो असं म्हणतात. 


वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, "ही आपल्या देशातील दुर्मिळ घटना असली तर थंड हवामान असलेल्या देशांमध्ये ही घटना सामान्य आहे. जेव्हा सूर्याभोवत आर्द्रता असलेले ढग असतात तेव्हा ही घटना घडते. त्यामुळे अशाप्रकारचं दृश्य एकाच परिसरात दिसतं." या घटनेची भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. सूर्याजवळ आर्द्रतायुक्त ढग असतात त्यावेळी ही घटना घडते. चक्रीवादळानंतर असे ढग तयार होतात आणि अशाप्रकारे सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ तयार होते, असंही म्हटलं जातं.