Trending: ब्रिटनमधील (Britain) वेल्समध्ये नुकताच एका मुलीचा जन्म झाला असून तिचं वजन केवळ 328 ग्रॅम आहे. या मुलीचा जन्म नियोजित वेळेच्या पाच महिने अगोदर झाला, हे आश्चर्यकारक आहे. मुलीच्या आईला गरोदरपणात (Pregnancy) एवढा त्रास झाला की ती हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिने लगेच नवजात बाळाला (New Born Baby) जन्म दिला. हे नवजात बाळ वेल्समध्ये जन्मलेलं आतापर्यंतचं सर्वात लहान मूल आहे. या मुलीचं नाव रॉबिन चेंबर्स (Robyn Chambers) आहे, तर तिच्या आईचे नाव चँटेल चेंबर्स आणि वडिलांचं नाव डॅनियल चेंबर्स आहे.


सर्वात लहान नवजात बाळाचा किताब


रॉबिनच्या आई-वडिलांचं म्हणणे आहे की, तिचा जन्म झाला तेव्हाच आम्हाला माहित होतं की ती इतकी लहान असेल. पण तिला हॉस्पिटलमध्येच आयुष्य काढावं लागेल, अशी कल्पना त्यांनी केली नव्हती. ग्रॅंज हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या रॉबिनला अॅन्युरिन बेव्हन युनिव्हर्सिटी हेल्थ बोर्डाने वेल्समध्ये जन्मलेल्या सर्वात लहान बाळाची पदवी प्रदान केली आहे. या बाळाचं वजन 328 ग्रॅम आहे. ती इतकी लहान आहे की ती तिच्या आईच्या तळहातात बसलेली दिसते.


अवघ्या 23 आठवड्यात जन्मली मुलगी


डेली मिररच्या वृत्तानुसार, वडील डॅनियल म्हणाले, ही या रुग्णालयात जन्मलेली सर्वात लहान मुलगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. या नवजात बाळाला केवळ रुग्णालयात ठेवण्याच आलं नाही, तर या बाळाच्या नावावर रेकॉर्डही बनला आहे. रॉबिन ही वेल्स शहरात जन्मलेली सर्वात लहान मुलगी ठरली आहे.


रॉबिनचा जन्म अवघ्या 23 आठवड्यात, म्हणजेच 4 महिन्यांनी झाला. आई चँटेलने सांगितलं की, गर्भधारणेच्या 22 आठवड्यांनंतर तिला वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की, मूल कदाचित जगणार नाही, पण सुदैवाने तसं झालं नाही.


नवजात बाळ सध्या व्हेंटिलेटरवर


रॉबिनचा जन्म झाल्यावर तिला ताबडतोब व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तिला सेप्सिसचा त्रास जाणवत आहे. ती इतकी लहान आहे की, तिच्या शिरा शोधण्यासाठी डॉक्टरांना खूप वेळ लागतो. सुरुवातीला तिचं वजन वाढवण्यासाठी डॉक्टरांना खूप अडचणींचा सामना करावा लागला, पण हळूहळू तिचं वजन वाढू लागलं. आता रॉबिन तीन महिन्यांची आहे आणि तिचं वजन 1 किलोग्रॅम आहे. मात्र, जुलैमध्ये तिचा जन्म झाल्यापासून ती घरी गेली नसून अद्यापही रुग्णालयातच आहे.


हेही वाचा:


Success Story: भावाकडून 5000 उधार; व्यवसाय सुरु केला, पण सतत अपयश अन् आज 14,000 कोटींच्या कंपनीचे मालक