Viral Video: एस्केलेटरवर (Escalator) चढणं हे बर्‍याच लोकांसाठी खूप कठीण असतं. जे लोक दररोज एस्केलेटर वापरतात किंवा त्याची ज्यांना सवय आहे, त्यांच्यासाठी एस्केलेटर चढणं ही मोठी गोष्ट नाही. पण जे लोक एस्केलेटरवर पहिल्यांदाच चढत आहेत, त्यांच्यासाठी ते हाताळणं खूप कठीण आहे. एस्केलेटरवर चढताना नर्व्हस होताना किंवा इतरांच्या मदतीने चढताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल.


अनेकवेळा असंही होतं की, लोक पहिल्यांदा एस्केलेटर चढत असतात आणि त्यावेळी त्यांना कुणाच्या तरी मदतीची गरज असते. पण त्यांना मदत करणारे कोणी नसतात आणि तेव्हा ते एकटेच चढू लागतात आणि धडपडतात. असाच काहीसा प्रकार घडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. साडी नेसलेल्या दोन महिला एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. यात त्या खालीही पडतात, यानंतर बघ्यांची गर्दी होती. परंतु कुणी त्यांची मदत करायला पुढे सरसावत नाही.


नेमकं घडलं काय?


दोन बायका या पहिल्यांदा एस्केलेटरवर चढत होत्या. परंतु त्यांना चढता येत नव्हतं. या दोघी मूळच्या गावच्या होत्या आणि त्यांना कुणाच्या तरी मदतीची गरज होती. पण मदत न मिळाल्याने त्या एकट्याच एस्केलेटरवर चढू लागल्या.


तोल जाऊन खाली कोसळल्या


प्रथम एक बाई एस्केलेटरवर चढते, नंतर तिच्या मागून दुसरी चढण्याचा प्रयत्न करते. पण मागे उभी असलेली बाई पुढे असलेल्या बाईच्या साडीचा पदर पकडते आणि त्यामुळे तिला पुढे जाता येत नाही. पदर पकडल्यामुळे पुढे असलेली बाई मागचीवर पडते आणि दोघेही तोल जाऊन खाली कोसळतात.
यावेळी त्या दोघींच्या जवळच दोन माणसं उभी होती, जी त्यांना पाहत होती. मात्र, यापैकी कोणीही महिलांच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. ते नुसते बघत राहिले.


बघ्यांची गर्दी, मात्र मदतीली कुणीही नाही


या दोघी खाली कोसळून काही वेळ एस्केलेटरवरच पडून राहतात आणि उठून स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. खूप प्रयत्नांनंतर त्यांना स्वतःला बॅलन्स करणं जमतं. नंतर त्या बसून एस्केलेटरवर जातून. या महिलांचे चेहरे पाहून त्या किती घाबरल्या आहेत, याचा अंदाज तुम्हाला येईल. इथे आश्चर्याची बाब म्हणजे, या दोघींच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही. सगळे जण पुतळ्यासारखे फक्त तमाशा बघत उभे राहिले.




युजर्सनी दिल्या प्रतिक्रिया


हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, 'तिला खूप लागलं असेल, ती वृद्ध बाई आहे.' तर दुसऱ्या युजरने व्हिडीओ मेकरला फटकारलं आणि म्हटलं, 'तू व्हिडिओ का बनवत होतास? तू आधी त्यांना मदत करायला हवी होती.'


हेही वाचा:


VIDEO: कॅब बुक नाही झाली म्हणून पठ्ठ्याने झोमॅटोवरुन ऑर्डर केलं जेवण; डिलिव्हरी बॉयच्या बाईकवर बसून पोहोचला घरी