Trending : शार्क मासा (Shark) इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे झोपत नाहीत असे आतापर्यंत म्हटले जात होते. पण आता असे समोर आले आहे की, शार्क कधीकधी दोन्ही डोळे उघडे ठेवून झोपतात. मेलबर्नच्या 'ला ट्रोब युनिव्हर्सिटी'च्या (La Trobe University) स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस आणि न्यूझीलंडच्या ऑकलंड विद्यापीठातील मरीन सायन्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त अभ्यासात असे आढळून आले आहे की शार्क माश्याची झोपण्याची पद्धत इतर सस्तन प्राण्यांपेक्षा खूप वेगळी आहे.


शास्त्रज्ञांना आधी हे माहित होते की शार्कच्या काही प्रजाती झोपताना पोहतात, ज्यामुळे त्यांच्या गिलांमधून ऑक्सिजन समृद्ध पाणी वाहते. अभ्यासादरम्यान, ईशान्य न्यूझीलंडमधील हौराकी खाडीतून सात ड्राफ्टबोर्ड शार्कचे निरीक्षण करण्यात आले. बाहेरील मत्स्यालयात ठेवल्यानंतर त्यांचे बारकाईने निरीक्षण आणि रेकॉर्डिंग करण्यात आले. पोहताना आणि विश्रांती घेताना शार्क माशांचे डोळे नेहमी उघडे असतात असे शास्त्रज्ञांनी पाहिले. मात्र, काही वेळाने शार्कने पाच मिनिटांपेक्षा जास्त डोळे मिटले. याचा अर्थ ते झोपी गेला होता.


शार्कचे डोळे सुमारे 38 टक्के उघडे राहिले. संशोधकांनी असे निरीक्षण नोंदवले आहे की, झोपेताना डोळे बंद करण्याचे वर्तन दिवसा अधिक होते. या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, कमी चयापचय दर आणि शरीराची सपाट स्थिती शार्कच्या झोपेचा संकेत आहे. विशेष म्हणजे शार्कच्या झोपेबाबतचा असा सखोल अभ्यास यापूर्वी कधीही झालेला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha