Shampoo Bottle Or Shampoo Sachet: तुमच्या दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये शॅम्पूलाही (Shampoo) खूप महत्त्व आहे. दर महिन्याला प्रत्येक घरात शॅम्पूचा भरघोस वापर होतोच. अनेकांना नेहमीच्या वापरातला शॅम्पू हा एक-दोन रुपयांना मिळणाऱ्या सॅशेच्या रूपात विकत घ्यायला आवडतो, तर अनेकजण शॅम्पूची एकच बॉटल खरेदी करणं पसंत करतात.
शॅम्पूचा सॅशे खरेदी करायचा की बॉटल? यामागे लोकांचे वेगवेगळे तर्क असतात आणि त्यामुळे लोक वेगवेगळ्या स्वरुपात शॅम्पूची खरेदी करतात. अनेकजण पैसे कसे वाचतील? हे लक्षात घेऊन शॅम्पू खरेदी करतात. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, सॅशे खरेदी करणं हे स्वस् आणि फायदेशीर ठरतं, तर काही लोक शॅम्पूची बॉटल खरेदी करणं किफायतशीर मानतात. तर जाणून घेऊया, शॅम्पूचे 100 सॅशे खरेदी करणं फायदेशीर ठरेल की 100 रुपयांची अख्खी बॉटल...
शॅम्पू खरेदी करताना कोणच्या मुद्द्यांची चर्चा?
शॅम्पूच्या पाऊचमध्ये जास्त शॅम्पू मिळतो की बॉटलमध्ये? यावर अनेकदा वाद होत असतो. अनेकजण शॅम्पूचा पाऊच कुठेही सहज नेता येत असल्याने आणि कमी जागा घेत असल्याने पाऊचला पसंती देतात. तर काहीजण शॅम्पूचे सॅशे वापरुन वॉशरुममध्ये कचरा होऊ नये म्हणून शॅम्पूची बॉटल खरेदी करण्यास पसंती दर्शवतात. अनेक लोकांना असं वाटतं की, बॉटलमधील शॅम्पूचा दर्जा (Shampoo Quality) चांगला असतो, म्हणून ते बाटलीतला शॅम्पू खरेदी करतात.
शॅम्पूचे एक-दोन रुपयांचे सॅशे वापरणं नेहमी फायदेशीर ठरतं, याचं एक कारण म्हणजे, एका वेळी किती शॅम्पू वापरायचा याचा अंदाज आपल्याला येतो. हेच जर शॅम्पूच्या बॉटलबद्दल बोलायचं झालं तर बॉटलमध्ये आपल्याला शॅम्पूचा अंदाज येत नाही आणि आपण भरमसाठ शॅम्पू वापरतो, ज्यामुळे बॉटल लवकर संपते आणि पुन्हा आपल्याला खरेदी करावी लागते. या प्रक्रियेत बरेच पैसे वाया जातात.
बॉटलमध्ये शॅम्पू जास्त मिळतो की सॅशेमध्ये?
यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये या गोष्टीची रिअॅलिटी टेस्ट केली गेली आहे. अनेक रिअॅलिटी चेकमध्ये, शॅम्पूच्या बॉटलच्या किमतीइतकेच शॅम्पूचे सॅशे विकत घेतले जातात आणि त्या किमतीत बॉटलमध्ये जास्त शॅम्पू मिळाला की सॅशेमध्ये हे चेक केलं जातं.
एका व्हिडिओमध्ये, एक YouTuber सुमारे 500 रुपयांना शॅम्पूची बाटली खरेदी करतो आणि त्याच रकमेमध्ये त्याच शॅम्पूचे पाऊच खरेदी करतो. दोन्ही शॅम्पूचे वजन केले असता धक्कादायक आकडेवारी समोर आली. प्रत्यक्षात, या तपासणीत असं आढळून आलं की, बाटलीतून 600 मिली शॅम्पू मिळाला, त्याच रकमेत घेतलेल्या शॅम्पू सॅशेमधून 1 लिटरपेक्षा जास्त शॅम्पू निघाला.
यावरून हे स्पष्ट होतं की, जर तुम्ही पाउचमध्ये/सॅशेमध्ये शॅम्पू खरेदी केला तर शॅम्पू जास्त मिळतो, जे खूप फायदेशीर आहे. पाऊचमधील शॅम्पू खरेदी करुन तुम्ही कमी पैशात बॉटलपेक्षा जास्त शॅम्पू खरेदी करू शकता. शॅम्पूच्या सॅशेमध्ये बॉटलपेक्षा जास्त शॅम्पू मिळतो.
हेही वाचा:
Oral Cancer: 'अशी' असतात तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं; ठरू शकतो घातक