Serial Killer Queen Elezabeth Bathory : तुम्ही चित्रपटांमध्ये अनेक सीरियल किलर्स (Serial Killer) पाहिले असतील. सीरियल किलर अत्यंत क्रूरपणे खून (Murder) करताना अनेक चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. अशा अनेक कथा आणि रहस्य इतिहासाच्या पानांमध्येही दडलेली आहेत, हे जाणून तुम्ही चांगलेच थक्क व्हाल. आज आम्ही अशाच एका महाराणीची गोष्ट सांगणार आहोत. या राणीला लोक खूप घाबरायचे आणि त्यांचं कारणही तसंच होतं. ही महाराणी जगातील सर्वात क्रूर आणि सीरियल किलर महाराणी म्हणून ओळखली जाते.
सुंदर दिसण्यासाठी तरुणींच्या रक्ताने अंघोळ
या महाराणीबद्दल ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. इतिहासात एक महाराणी अशी होऊन गेली, जी सीरियल किलर म्हणून ओळखली जाते. ही राणी तरुणींची क्रूरपणे हत्या करायची. इतकंच नव्हे तर त्यांच्या रक्ताने अंघोळ करायची. हंगरीची महाराणी एलिझाबेथ बाथरी (Elezabeth Bathory) हिला अत्यंत क्रूर महाराणी म्हटलं जातं. एलिझाबेथ बाथरी जगातील सर्वात धोकादायक आणि क्रूर राणी असल्याचं सांगितलं जातं.
सीरीयल किलर महाराणीची कहाणी
एलिझाबेथ बाथरीला सीरीयल किलर महाराणी म्हटलं जातं. ही राणी सुंदर दिसण्यासाठी कुमारी मुलींना मारून त्यांच्या रक्ताने अंघोळ करायची. 1585 ते 1610 या काळात, राणी बाथरीने 600 हून अधिक मुलींना मारलं आणि त्यांच्या रक्ताने अंघोळ केली. असे म्हटले जाते की, एलिझाबेथला तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी कोणीतरी तिला तरुणींच्या रक्ताने अंघोळ करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ही राणी तरुणींची हत्या करून त्यांच्या रक्ताने अंघोळ करायची.
नोकरीच्या बहाण्याने मुलींना जाळ्यात अडकवायची
एलिझाबेथला जणू वेड लागलं होतं. तिची सुंदर दिसण्याची आणि ती सुंदरता टिकवण्याची इच्छा होती. याचा इतका परिणाम झाला की तिने यासाठी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. प्रचलित कथांनुसार, एलिझाबेथ बाथरी मृत मुलींचे मांस तिच्या दाताने चावत असे. बाथरीच्या या गुन्ह्यात तिच्या तीन नोकरांनीही तिला साथ दिल्याचं बोललं जातं. एलिझाबेथचं लग्न फेरेंक नादेस्दी नावाच्या व्यक्तीशी झाला. नादेस्दीला तुर्कांविरुद्धच्या युद्धात हंगेरियन राजा होता. एलिझाबेथ आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींना राजवाड्यात चांगल्या पैशासाठी काम करण्याचे आमिष दाखवत असे. मुली वाड्यात येताच ती त्यांना आपलं शिकार बनवायची.
मुलींची संख्या कमी झाल्यावर अडकली राणी
प्रचलित कथेनुसार, सुंदर दिसण्यासाठी एलिझाबेथचा क्रूरपणा कायम होता. यानंतर जेव्हा परिसरात गरीब मुलींची संख्या कमी होऊ लागली, तेव्हा तिने उच्च कुटुंबातील मुलींना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली. हंगेरीच्या राजाला ही गोष्ट समजली. त्याने त्याची चौकशी केली. जेव्हा तपासकर्ते एलिझाबेथच्या राजवाड्यात पोहोचले तेव्हा त्यांना तेथे अनेक मुलींचे सांगाडे आणि सोन्या-चांदीचे दागिने सापडले. अखेरीस 1610 मध्ये एलिझाबेथला तिच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली. या गुन्ह्यासाठी तिला राजवाड्यातील एका खोलीत कैद करण्यात आले. येथे चार वर्षे कैदेत राहिल्यानंतर 21 ऑगस्ट 1614 रोजी तिचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :