Imprisonment For Heart Emoji : सध्या आधुनिक जगात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सोशल मीडियावर लोक एकमेकांसोबत सहज जोडले जातात. सोशल मीडियाचा वापर करुन कोणत्याही व्यक्तीसोबत सहज बोलता येतं. एखाद्या व्यक्तीसोबत चॅट करताना आपल्या भावना योग्यप्रकारे व्यक्त करण्यासाठी आपण इमोजींचाही (Emoji) सर्रास वापर करतो. कधी स्माईली, तर कधी हार्ट यासारखे इमोजी (Emoticon) पाठवून आपण समोरच्याला आपल्या भावना व्यक्त करतो. पण, असं करणं आता गुन्हा मानला जात असून तुम्हाला त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 


महिलांना चॅटवर 'हॉर्ट' इमोजी पाठवताय?


जर तुम्हीही महिलांसोबत चॅट करताना त्यांना 'हॉर्ट' इमोजी पाठवत असाल तर, तु्म्हाला तुरुगांची हवा खावी लागेल. व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर महिलांना ‘रेड हार्ट’ इमोजी पाठवणे हा कुवेत आणि सौदी अरेबिया (KSA) मध्ये गुन्हा मानला जातो. त्यामुळे आखाती देशांमधील मुस्लिम देश कुवैत (Kuwait) आणि सौदी अरेबियामधील (Saudi Arabia) महिलांना 'हॉर्ट' इमोजी पाठवल्यास तुम्ही अडचणीत सापडाल. असे केल्या तुम्हाला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. गल्फ न्यूजच्या (Gulf News Report) रिपोर्टनुसार, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कुवैत (Kuwait) आणि सौदी अरेबियातील (Saudi Arabia) महिला किंवा तरुणी यांना 'हॉर्ट' इमोजी पाठवल्यास हा गुन्हा मानला जाईल आणि संबंधित व्यक्तीला याची शिक्षा भोगावी लागेल. महिलांना हार्ट इमोजी पाठवणे, म्हणजे एक प्रकारे छेड काढल्याचं मानलं जाईल.


हॉर्ट इमोजी पाठवल्यास होईल 'ही' शिक्षा


कुवेतमधील वकील हया अल सलाही (Haya Al-Shalhi) यांनी सांगितलं आहे की, जे हा कायदा मोडतील आणि दोषी आढळतील त्यांना दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल. एवढेच नाही तर संबंधित व्यक्तीवर 2000 कुवेती दिनार म्हणजेच सुमारे 5.38 लाख रुपये दंडही ठोठावण्यात येणार आहे. 


सौदी अरेबियामध्ये जर कोणी महिलांना हार्ट इमोजी पाठवताना पकडलं गेलं तर संबंधित दोषी व्यक्तीला दोन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय दोषी व्यक्तीला 1 लाख सौदी रियाल म्हणजेच 22 लाख रुपये दंडही भरावा लागू शकतो. पण, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण हा नियम फक्त कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Trending News : 90 वर्षांचे आजोबा पाचव्यांदा बोहल्यावर, म्हणतात... 'लग्न हेच माझ्या दिर्घायुष्याचं रहस्य, पुन्हा निकाह करण्याची इच्छा'