Pakistani Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदरचा (Seema Haider) नवा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सीमा हैदरला मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. सीमाचा पती सचिनने तिला मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. सीमा आणि सचिन यांच्यात भांडण झाल्याचं सांगत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरचे कोणते न कोणते व्हिडीओ चर्चेत येतच असतात. आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. 


पाकिस्तानी सीमा हैदरला पती सचिनकडून मारहाण?


व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सीमा हैदरला कथित मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सीमा हैदरच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमेच्या खुणा दिसत आहेत. सचिन आणि सीमा यांच्यातील भांडणाच्या नावाखाली हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर आणि पोस्टही करण्यात आला आहे.


सीमाच्या शरीरावर मारहाणीचे व्रण


भारतात अवैध मार्गाने आलेली सीमा हैदर सध्या उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे पती सचिन आणि मुलांसोबत राहत आहे. सीमाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या नवीन व्हिडीओमध्ये सीमाचा चेहरा आणि शरीरावर मारहाणीनंतरच्या जखमेच्या अनेक खुणा दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सीमा रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पती सचिन मीनावर सीमाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण, यामागचं सत्य काय? वाचा सविस्तर.


पबजी गेममुळे झालं प्रेम


पबजी गेममुळे पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय सचिन मीना यांची ओळख झाली. हळूहळू ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर सीमा हैदर तिच्या मुलांसह थेट भारतात पोहोचली. पाकिस्तानी सीमा हैदर नेपाळमधून रस्ते मार्गे भारतात पोहोचली. त्यानंतर सचिन आणि सीमा यांनी लग्न केलं आणि ते दोघे मुलांसोबत नोएडामध्ये राहत आहे. सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप अनेक वेळा करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सापडलेली नाही. पाकिस्तानी सीमा आणि भारतीय सचिन यांची प्रेमकहाणी चांगलीच चर्चेत होती.


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


दरम्यान, आता सीमा हैदरच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सीमाच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसत आहेत. सीमा रडताना दिसत आहे. सचिन आणि सीमा यांच्यात भांडण झाल्याने सचिनने सीमाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओद्वारे करण्यात येत आहे. आता या व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.


व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?


दरम्यान, सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी हा व्हिडीओ बनावट असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून बनवण्यात आल्याचा दावा वकिलाने केला आहे. या व्हिडीओचा सीमासोबत कोणताही संबंध नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर व्हायरल झाला आहे. तर हा पूर्णपणे बनावट व्हिडीओ असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Seema Haider Husband : सीमा हैदरचा पती सचिनची गोळी झाडून हत्या? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य