Seema Haider And Sachin Meena News : पाकिस्तानातून (Pakistan) भारतात पळून आलेली सीमा हैदरचा (Seema Haider) पती सचिन मीनाची (Sachin Meena) हत्या झाल्याची बातमी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Video) होत आहे. सीमा हैदर (Seema Haider News) आपल्या 4 मुलांसह सचिन मीनासोबत (Sachin Meena News) भारतात (India) आली होती, दोघेही एकत्र खूप आनंदी होते. असं असताना, सोशल मीडियावर सचिन मीनाबद्दलची एक बातमी (Viral News) वेगाने पसरत आहे. सचिनची हत्या (Sachin Meena Death News) झाल्याचा दावा (Viral News)करण्यात येत आहे. पाकिस्तानी सीमा हैदरच्या पती सचिनला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Fake News) होत आहे. या व्हिडीओमागचं सत्य जाणून घेऊया.


सीमा हैदरचा पती सचिनची गोळी झाडून हत्या? 


सीमा आणि सचिनचे दररोज काही ना काही बातम्या किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर येत राहतात. हे जोडपं कायम चर्चेत असतं. आता सचिनची हत्या झाल्याचा व्हिडीओ आणि बातम्या जोरदार व्हायरल होत आहेत. सीमा हैदरचा पती सचिन मीनाची गोळी झाडून हत्या झाल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर दावा, व्हिडीओही व्हायरल


सीमा हैदरचा पती सचिन याची कोणीतरी गोळ्या झाडून हत्या केली आहे. यासोबतच पतीच्या निधनानंतर सीमा हैदर पूर्णपणे खचून गेल्याचा दावा केला जात आहे. यासोबतच एका पोलीस अधिकाऱ्याचे वक्तव्यही व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. लोक कमेंटमध्ये विविध प्रतिक्रिया मांडताना दिसत आहेत.


सचिनची हत्या झाल्याचा दावा


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यामध्ये कोणीतरी सचिन मीनाची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘सीमा हैदरच्या पती सचिनची कोणीतरी हत्या केली’ असं लिहिलं आहे.


सीमा हैदर रडतानाचा व्हिडीओ व्हायरल


यासोबतच सीमा हैदरचे रडतानाचे फोटोही व्हिडीओमध्ये आहेत. व्हिडीओबाबत दावा केला जात आहे की, हा घटनास्थळाचा व्हिडीओ आहे. यासोबतच एक पोलीस अधिकारी या घटनेबाबत सांगत आहे. मात्र, याबाबत पूर्ण माहिती देण्यात आलेली नाही.


व्हायरल व्हिडीओमागचं सत्य


दरम्यान, हा व्हिडीओ फेक असल्याचं समोर आलं आहे. कोणत्याही मीडियाने सचिन मीनाच्या मृत्यूची बातमी प्रकाशित केलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ फेक असून गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने व्हायरल केला गेला आहे. पाकिस्तानातून भारतात पळून आलेली सीमा हैदर ग्रेटर नोएडामध्ये पती सचिन मीना आणि मुलांसह वास्तव्यास आहे.