Ship Hits Iceberg Video : टायटॅनिज (Titanic) जहाज दुर्घटना आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. टायटॅनिज जहाज मोठ्या हिमनगावर (Iceberg) आदळलं आणि होत्याचं नव्हतं झालं. याप्रमाणेच अलिकडे घडलेल्या एका थरारक दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. अलास्कामध्ये एक जहार विशालकाय हिमनगावर धडकल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच अंगावर नक्की शहारा आणणारा असा हा व्हिडीओ आहे.


25 जून रोजी घडली घटना
नॉर्वेमधील एक जहाज (Norway) अलास्का येथील (Alaska) हबर्ड ग्लेशियरमध्ये (Hubbard Glacier) एक विशालकाय हिमनगावर आदळलं. 25 जून रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान ही घटना घडली. यानंतर या दुर्घटनाग्रस्त जहाजाला त्याची यात्रा मधेच रद्द करावी लागली. जहाजावरील प्रवाशांनी या थरारक घटनेटं चित्रीकरण केलं आहे. 


हिमनग पाहून प्रवासी घाबरले
बेंजामिन टॅलबोट यांनी मीडियाला सांगितले की, 'माझ्या भावाने जहाज हिमनगाला धडकताना पाहिलं. या धक्क्यानं सारेच हादरले होते. जणूकाही जोरात आघात झाल्यासारखं वाटलं.'






 


टायटॅनिज 2.0 चा लाईव्ह व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जहाजावरील व्यक्ती घाबरून या घटनेला टायटॅनिक 2.0 असा उल्लेख करत आहेत. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही, क्रूने वेळीच जहाजाची पुढील यात्रा रद्द करत जहाज सुरक्षित बंदरावर आणलं.


मीडिया रिपोर्टनुसार, नॉर्वेहून निघालेलं हे जहाज जुनोसाठी रवाना झालं होतं. या जहाजाला पुन्हा बंदरामध्ये परतण्याची परवानगी देण्यात आली. 26 जूनला हे जहाज सिएटलमध्ये सुरक्षित परतलं असून त्याची डागडूजब होईपर्यंत ते तिथेच राहील.


संबंधित बातम्या