Trending IAS Topper : UPSC मध्ये दुसरा क्रमांक पटकावणारे आयएएस अतहर आमिर खान (Athar Aamir Khan) सध्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. अतहर आमिर दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. याधी आईएएस टॉपर टीना दाबी (IAS Tina Dabi) यांच्यासोबत लग्न आणि नंतर घटस्फोटामुळे चर्चेत होते. आता अतहर काश्मीरमधील एका डॉक्टरसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. अतहरची होणारी पत्नी डॉक्टर मेहरीन काजी (Dr Mehreen Qazi) श्रीनगरमधील आहे. अतहर आणि मेहरीन यांचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडिया पोस्ट द्वारे ही माहिती समोर आली आहे. अतहरने फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट केली आहे.


अतहर आमिर खानचं पहिलं लग्न आयएएस टॉपर टीना दाबीसोबत झालं होतं. याचं लग्न बरंच चर्चेत राहिलं पण, हे जास्त काळ टिकू शकलं नाही. नंतर 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतन टीना दाबीनं आयएएय प्रदी गावंडेसोबत लग्न केलं. 






कोण आहे डॉ. मेहरीन?


अतहर आमिर खानची होणारी पत्नी डॉ. मेहरीन काझी देखील जम्मू-काश्मीरची रहिवासी असून आणि व्यवसायाने डॉक्टर आहे. मेहरीने मेडिसीनमध्ये एमडी पदवी घेतली आहे. सध्या मेहरीन उमर कॉलनी, लाल बाजार, दिल्ली येथे राहत असून, तेथील रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर असण्यासोबतच मेहरीनला फॅशनमध्येही खूप रस आहे. ती सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. ती सोशल मीडिया इंन्फ्लूएन्सर आहे. मेहरीनचे इन्स्टाग्रामवर 200k पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.






 


संबंधित बातम्या