मुंबई : जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांची यादी दरवर्षी प्रकाशित होते. त्यामध्ये आपल्या देशातील उद्योगपतींची नावंही असतात. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत बरेच काळ वरच्या स्थानी होते. पण गेल्या काही वर्षांपासून ती जागा टेस्लाच्या इलॉन मस्क यांनी घेतली आहे. आपल्याला श्रीमंत लोकांची नावं माहिती असतात. पण कोणत्या धर्मातील  सर्वाधिक लोक श्रीमंतांच्या यादीत आहेत किंवा सर्वात श्रीमंत धर्म कोणता असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्याबद्दल फारशी माहिती नसते. त्याचबद्दल आपण जाणून घेऊयात. 


न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक संपत्ती ख्रिश्चन धर्मियांकडे आहे. यानंतर मुस्लिम आणि त्यानंतर हिंदूंचा क्रमांक लागतो. अहवालात असे म्हटले आहे की, जगभरात ख्रिश्चनांकडे सर्वाधिक संपत्ती आहे, त्यानंतर मुस्लिम आणि त्यानंतर हिंदू आहेत. त्याचबरोबर जगातील संपत्तीचा मोठा हिस्सा कोणत्याही धर्माला न मानणाऱ्यांकडे म्हणजे नास्तिकांकडे आहे.


ख्रिश्चनांकडे सर्वाधिक संपत्ती


न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार, धर्माच्या आधारावर 'हाय नेट वर्थ इंडिव्हिजुअल्स' (दशलक्ष डॉलर्स किंवा त्याहून अधिक) या यादीत ख्रिश्चनांचे वर्चस्व आहे. यानंतर मुस्लिम आणि त्यानंतर हिंदूंचा क्रमांक लागतो. अहवालानुसार, ख्रिश्चन धर्माच्या लोकांकडे 107,280 अब्ज डॉलरची संपत्ती आहे, जी जगातील एकूण संपत्तीच्या 55 टक्के आहे.


मुस्लिम आणि हिंदूंची मालमत्ता किती?


ख्रिश्चन धर्मियांनंतर मुस्लिमांचा क्रमांक येतो. जगभरातील मुस्लिम समुदायाच्या लोकांकडे 11,335 अब्ज रुपयांची संपत्ती आहे, जी जगातील एकूण संपत्तीच्या 5.9 टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर हिंदू धर्माचे लोक आहेत, ज्यांची संपत्ती 6,505 अब्ज रुपये (3.3क्के) आहे. तर ज्यू धर्माच्या लोकांकडे एकूण संपत्ती 2,079 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे, जी 1.1 टक्के आहे.


नास्तिकांकडे मोठी संपत्ती


या अहवालानुसार, जगातील 10 श्रीमंत देशांपैकी सात देश ख्रिश्चन बहुसंख्य आहेत. त्याच वेळी, जगाच्या एकूण संपत्तीचा मोठा भाग (67,832 अब्ज अमेरिकन डॉलर्स) कोणत्याही धर्माला न मानणाऱ्या लोकांकडे आहे. हे एकूण मालमत्तेच्या 34.8 टक्के आहे.


ही बातमी वाचा: