Udit Narayan Kissing Female Fan Video Viral : प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण हे गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. उदित नारायण यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते महिला चाहतीला किस करताना दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ माजली. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये उदित नारायण पुन्हा एकदा महिलांना किस करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यावर नेटकऱ्यांनी कडक शब्दात संताप व्यक्त केला आहे. अनेक युजर्सने निशाणा साधला आहे. नेटकऱ्यांनी उदित नारायण यांना 'सीरियल किसर' असं नावं दिलं आहे.


उदित नारायण यांचा दुसरा किसिंग VIDEO व्हायरल


काही दिवसांपूर्वी उदित नारायण यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते लाईव्ह सिंगिग शोमध्ये महिला चाहत्यांना किस करत होते. महिला चाहत्या उदित यांच्यासोबत सेल्फी काढायला आल्या, त्यावेळी त्यांनी फॅन्सला किस केलं. उदित नारायण यांनी काही महिला चाहत्यांना गालावर किस केलं, तर एका महिलेला ओठांवर जबरदस्ती किस केलं. या प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला, त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन मोठा हंगामा झाला, त्यातच आता त्यांचा दुसरा किसिंग व्हिडीओ समोर आला आहे.


महिला फॅनसोबत केलं लिपलॉक


आता उदित नारायण यांचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते महिला चाहतीसोबत लिपलॉक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी उदित नारायण यांना 'सीरियल किसर' म्हणत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये काही महिला उदित यांच्याजवळ येऊन सेल्फी काढण्यासाठी स्टेजजवळ येतात. यावेळी उदित सेल्फि काढतात आणि एका महिला चाहतीसोबत लिपलॉकही करतात. सुरुवातीला ते महिलेच्या गालावर किस करतात, त्यानंतर ते ओठांवर किस करतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.


नेटकरी काय म्हणाले?


एका युजरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलंय, आता बघा, "बाजारात एक नवीन 'SERIAL KISSER' आला आहे! उदित नारायण यांचा एक व्हिडीओ आधीच व्हायरल झाला होता, आता दुसरा व्हिडीओ देखील आला आहे. त्या महिला फक्त सेल्फी काढण्यासाठी आल्या होत्या, पण उदितजींचे लक्ष्य फक्त त्यांच्या ओठांकडे होते! हे सामान्य किस नाही, तर ओठांनी केलेलं एक खास किस आहे!भाईसाहेब, त्यांनी इमरान हाश्मीसोबत स्पर्धा करायला सुरुवात केली आहे."


नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया






"ओठांवर केलेलं किसच हवं..."


दुसऱ्याने लिहिलंय, "आता बाजारात एक सीरियल KISSER आला आहे... उदित नारायण यांचा आणखी एक व्हिडिओ आला आहे. महिला उदित नारायणसोबत सेल्फी काढत आहेत, पण उदित नारायण त्यांचे ओठ शोधून त्यांना धडाधड किस करत आहेत. उदित नारायण सामान्य किस करत नाही, त्यांना ओठांवर केललं किस हवं आहे".






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Udit Narayan: उदित नारायण यांनी महिलांना लाईव्ह KISS केलं; व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण देत म्हणाले…