Viral Photo : एखाद्याला प्रेमाने, मनापासून आणि दयाळूपणाने केलेले उपकार नेहमीच लोकांची मनं जिंकतात. तेच कार्य जेव्हा एखाद्या लहान मुलाच्या हातून होत असेल तर ते हदयाला जास्तच भिडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शाळकरी मुलगा एका वृद्ध जोडप्याला पाणी देताना दिसत आहे. 


हा हृदयस्पर्शी फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या फोटोत लहान मुलगा रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका वृद्ध जोडप्याकडे त्यांच्या बाटलीत पाणी भरताना दिसत आहे. लहान मुलांकडे जर अशी भावना निर्माण होत असेल तर जग नक्कीच बदलण्याची एक प्रेरणा मिळते. हा फोटो शेअर करत आयएएस अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "द्वेष शिकवला जातो, दयाळूपणा नैसर्गिक आहे."



Viral Photo : चिमुकल्याने भागवली वृद्धजोडप्याची तहान; फोटो पाहून नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव


या फोटोला आतापर्यंत 23 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याच वेळी, ट्विटर यूजर्स मुलाच्या या वागण्याची प्रशंसा करत आहेत. एका यूजरने लिहीले आहे," दृष्टी ही तुमची प्रेरणा आहे". दुसर्‍या यूजरने लिहिले की, "दयाळूपणा ही एक सार्वत्रिक भाषा आहे, जी लहानपणापासूनच मुलांना शिकवली पाहिजे. एका यूजरने लिहिले आहे की, "मानवतेचे परिपूर्ण उदाहरण." एकंदरीत या लहनाग्याच्या या कृतीवर सोशल मीडियावर यूजर्सची फारच पसंती पाहायला मिळते. 


महत्वाच्या बातम्या :