Qatar Strict Law: कतारमधील (Qatar) न्यायालयाने 8 भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर कतारची हेरगिरी करण्याचा आणि त्यांची माहिती इतर देशांमध्ये पसरवल्याचा आरोप करण्यात आला. या सर्वांना काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर कतार देश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


कतारच्या या निर्णयादरम्यान या माजी नौसैनिकांना मुक्त करण्यासाठी भारत सरकारला  सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं जात आहे. सध्या याच कारणामुळे कतार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज कतारच्‍या अशाच एका कायद्याबद्दल जाणून घेऊया, जो खूपच विचित्र आहे आणि ज्यावर जगभरातून टीका होत आहे.


फिफा विश्वचषकादरम्यान वाद


खरं तर कतारमध्ये प्रत्येक गोष्टीबाबत अनेक कडक कायदे करण्यात आले आहेत. येथे पॉर्न किंवा सेक्स निषिद्ध मानलं जातं. या देशात नेहमीच कडक कायदे करण्यात आले आहेत, पण 2022 मध्ये फिफा विश्वचषक (FIFA World Cup) झाला तेव्हा कतार जगभरात चर्चेला आला. हा विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच सर्व प्रकारचे नियम-कायदे लोकांना सांगण्यात आले होते. त्यावरून कतारमध्ये बराच वाद झाला होता.


वन नाईट स्टँडवर बंदी


यापैकी एक नियम असा होता की, कोणीही कतारमध्ये वन नाईट स्टँड ठेवू शकत नाही. जर कोणी हॉटेल किंवा फ्लॅटमध्ये वन नाईट स्टँड करताना आढळलं तर त्याला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, असं कतारनं स्पष्ट केलं. एका खोलीत फक्त पती-पत्नीला राहण्याची परवानगी होती, याच कारणामुळे कतारमधील हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना परवानगी दिली जात नव्हती. याशिवाय फुटबॉल सामन्यानंतर पार्टी करण्यावरही बंदी घालण्यात आली होती.


कतारमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर (Extra Marital Affair) म्हणजेच, कतारमध्ये लग्नाबाहेरील कोणत्याही प्रकारचे संबंध पूर्णपणे बेकायदेशीर आहेत आणि तसं केल्यास कठोर शिक्षा दिली जाते. अगदी उघड्यावर रोमान्स (Open Romance) करायलाही कतारमध्ये मनाई आहे. कोणी असं करताना आढळल्यास त्याला शिक्षा होते. कतारमध्ये अशाच प्रकारचे अनेक कडक कायदे आहेत, ज्यांची जगभरात चर्चा आहे.


बलात्कार करणाऱ्यांना कडक शिक्षा


कतारमध्ये (Qatar) प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा दिली जाते. विशेषत: बेकायदेशीर शारीरिक संबंध (Physical Relation) आणि बलात्कारासाठी (Rape) कठोर शिक्षेची तरतूद आहे. कतारमध्ये बलात्काराच्या आरोपीला अशी शिक्षा दिली जाते की, पुन्हा तो असा गुन्हा करण्याचीही हिंमत करणार नाही. कतारमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यातील दोषींवर दगडफेक केली जाते आणि त्यांचे गुप्तांग देखील कापले जातात. एवढंच नाही, तर ही प्रक्रिया खूप वेगाने होते. म्हणजे बलात्कार केल्यानंतर गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी तरतूद कतारमधील कायद्यात आहे.


हेही वाचा:


World News: इटलीत का जन्माला येत नाहीत मुलं? गेल्या तीन महिन्यांत एकाही बाळाचा जन्म नाही; धक्कादायक आहे कारण