Qatar Rape Punishment: कतार (Qatar) देश आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, येथे भारताच्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्वांना काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. कतारच्या तपास यंत्रणांनी त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप केला आहे.
कतारबद्दलच्या या चर्चेदरम्यान या देशात दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षांबद्दल जाणून घेऊया. विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कतारमध्ये काही कडक कायदे आहेत. महिलांवरील अत्याचाराबाबतही कतारमध्ये एक कायदा आहे, ज्यामध्ये आरोपीस अशी शिक्षा दिली जाते की ती पाहून पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा येतो.
बलात्कार करणाऱ्यांना कडक शिक्षा
कतारमध्ये (Qatar) प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा दिली जाते. विशेषत: बेकायदेशीर शारीरिक संबंध (Physical Relation) आणि बलात्कारासाठी (Rape) कठोर शिक्षेची तरतूद आहे. कतारमध्ये बलात्काराच्या आरोपीला अशी शिक्षा दिली जाते की, पुन्हा तो असा गुन्हा करण्याचीही हिंमत करणार नाही. कतारमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यातील दोषींवर दगडफेक केली जाते आणि त्यांचे गुप्तांग देखील कापले जातात. एवढंच नाही, तर ही प्रक्रिया खूप वेगाने होते. म्हणजे बलात्कार केल्यानंतर गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी तरतूद कतारमधील कायद्यात आहे.
उर्वरित जगात होतात या प्रकारच्या शिक्षा
कतार व्यतिरिक्त जगातील इतर देशांमध्येही बलात्कारासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. मुस्लिम देश कुवेतमध्येही बलात्काराच्या आरोपींना सात दिवसांच्या आत फाशीची शिक्षा दिली जाते. तसेच इराणमध्ये बलात्कार करणाऱ्याला 24 तासांच्या आत मारुन टाकलं जातं. अफगाणिस्तानातही बलात्कार करणाऱ्याला गोळ्या घालून मारण्याची शिक्षा दिली जाते. ही शिक्षा गुन्ह्याच्या आठवडाभरात दिली जाते.
सौदी अरेबियातही गुप्तांग कापणं किंवा फाशी देणं अशा शिक्षा दिल्या जातात. जर्मनीत बलात्कारानंतर मृत्यू किंवा हत्या झाल्यास गुन्हेगार व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा आहे. तर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी 10 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाते. दक्षिण आफ्रिकेत बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास पहिल्या वेळेस 15 वर्षं, तर दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 20 वर्षं आणि तिसऱ्यांदा बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
जगातील इतर देशांप्रमाणेच कतारमध्येही बलात्काराबाबत कठोर कायदे करण्यात आले आहेत. कतारने पहिल्यांदा फिफा विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं तेव्हा हे कायदे आणि नियम जगासमोर आले.
हेही वाचा: