मुंबई : भारतात चहा-कॉफीचे खूप शौकीन आहेत. सोशल मीडियावर चहा-कॉफीचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. अलिकडे सोशल मीडियावर अन्न पदार्थांसोबत अनेक एक्समेरिमेंट पाहायला मिळतात. आता कॉफी बनवण्याचाही एक एक्सपेरिमेंटल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक छोट्या टपरीवाल्याचा कॉफी बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याचं कारण म्हणजे या व्यक्तीने प्रेशर कूकर कॉफी तयार केली आहे. या दुकानदाराने प्रेशर कुकरच्या मदतीने कॉफी बनवण्याचा नवा जुगाड शोधून काढला आहे. 


प्रेशर कुकर कॉफी


सध्या प्रेशर कूकर कॉफीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही देशी जुगाडवाली कॉफी मशीन पाहून नेटकरीही दंग झाले आहेत. हा अतरंगी कॉफी बनवण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधताना दिसत आहे. ही प्रेशर कूकर कॉफी मशीन पाहून सगळेच थक्क झाले आहेत.


देशी जुगाड करुन बनवली कॉफी मशीन


व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही या दुकानदाराचा देशी जुगाड पाहू शकता. या व्यक्तीने प्रेशर कुकरचं रुपांतर कॉफी मशीनमध्ये केलं आहे. या कॉफी मशीनचा वापर करुन तो एकदम भारी कॉफी बनवतो. 'india_food_hustle' नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंट या प्रेशर कूकर कॉफीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'अतरंगी कूकरवाली कॉफी, ब्रँडेड कॉफीपेक्षाही भारी' असं लिहिलं आहे. 


व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण


व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने कुकरच्या वरच्या बाजूला एक छोटी कॉफी मशीन लावली आहे. यानंतर तो एका भांड्यात कॉफी, दूध आणि साखर टाकतो आणि कूकरला लावलेल्या पाईपमधून वापर करुन कॉफी तयार करतो. कुकरमधून येणाऱ्या निघणाऱ्या वाफेमुळे कॉफी तयार होते. यानंतर एक ग्राहक कॉफी पिऊन कौतुकही करतानाही दिसत आहे.


दरम्यान, अतरंगी प्रेशर कूकर कॉफीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून चांगचेच आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, कॉफी मशीनचे 10 हजार रुपये वाचले.


पाहा प्रेशर कूकर कॉफी मशीनचा व्हायरल व्हिडीओ






महत्त्वाच्या इतर बातम्या :


80 वर्षाच्या आजोबांना मिळाली 23 वर्षीय नवरी; लव्हस्टोरी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का, फोटो पाहणं तर सहन होण्यापलिकडचं