Pollution: नोव्हेंबर महिनाही सुरू होत नाहीत तेच दिल्ली, मुंबईसारख्या शहरांत प्रदूषण (Pollution) वाढलं आहे. प्रदूषणामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असून हवा विषारी होत आहे. मुंबई आणि दिल्लीत परिस्थिती सर्वात वाईट आहे, या शहरांत हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) धोक्याच्या पातळीवर गेला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडूनही विविध पावलं उचलली जात आहेत.


प्रदूषणामुळे लोकांचं वय कमी होत असल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, मग दिल्लीसारख्या शहरात तुम्ही राहत असाल तर तुमचं वय किती कमी होऊ शकतं हे तुम्हाला माहीत आहे का?


अहवालात धक्कादायक खुलासे


लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार, जगभरातील 16% लोकांचा प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होतो. याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीला सुमारे 65 वर्षं जगावं लागलं, तर तो 60 वर्षांच्या आधीच मरण पावतो. या अभ्यासात असंही सांगण्यात आलं आहे की, जगभरात दरवर्षी सुमारे 90 लाख लोकांच्या मृत्यूचं कारण प्रदूषण होतं. यामध्ये वायू प्रदूषण हे सर्वात धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे.


दिल्लीत किती कमी होत आहे लोकांचं वय?


आता प्रश्न येतो की, दिल्लीसारख्या शहरात राहणाऱ्या लोकांचं आयुष्य प्रदूषणामुळे किती कमी होऊ शकतं? तर, शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार, भारत हा दुसऱ्या जगातील क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश आहे. देशाची राजधानी दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या प्रदूषणामुळे दिल्लीत राहणाऱ्या लोकांचे आयुर्मान 11.9 वर्षांनी कमी होत आहे. गेल्या वर्षी वयोमर्यादा कमी करण्याचा हा आकडा 10 वर्षं होता.


म्हणजेच, दरवर्षी प्रदूषणामुळे लोकांचं आयुष्य सतत कमी होत आहे. संपूर्ण देशाबद्दल बोलायचं झाल्यास, भारतातील लोकांचं सरासरी वय प्रदूषणामुळे 5 वर्षांनी कमी झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जर तुम्हाला वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत जगायचं असेल तर दिल्लीत राहून तुम्ही फक्त 58 वर्षांपर्यंतच जगू शकाल. म्हणजे तुमच्या आयुष्यातील 12 वर्षं प्रदूषण कमी करुन टाकेल.


प्रदूषण सर्वांसाठीच धोकादायक


एचआयव्ही आणि मलेरियासारख्या प्राणघातक आजारांपेक्षा प्रदूषण अधिक घातक बनलं आहे. प्रदूषणाचा मानवाव्यतिरिक्त पक्षी आणि समुद्री जीवांवरही परिणाम होतो. दरवर्षी प्रदूषणामुळे हजारो जीवांचाही मृत्यू होतो. दरवर्षी प्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत विविध प्रकारचे अहवाल येत राहतात, मात्र त्यातील मृत्यूचे आकडे कमी होण्याऐवजी ते झपाट्याने वाढत आहेत.


हेही वाचा:


HIV आणि मलेरियापेक्षा घातक आहे प्रदूषण; दरवर्षी होतो लाखो लोकांचा मृत्यू