Funny Viral Video : एखादा कार्यक्रम किंवा उद्घाटन म्हटलं की, नेते किंवा पुढारी तिथे पोहोचतातच. मग अगदी शहरातील मोठा सोहळा असो किंवा गावखेड्यातील छोटा कार्यक्रम नेते किंवा पुढारी या कार्यक्रमांना जाणं चुकवत नाहीत. ज्यामुळे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत येतात. सध्या सोशल मीडियावर एका नेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचलेल्या नेत्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. क्रिकेट टुर्नामेंटच्या उद्घाटनावेळी नेत्याने फलंदाजी करत जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण जोशात त्यांचा तोल जाऊन ते तोंडवर पडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
क्रिकेटच्या मैदानात बँटिग करण्यासाठी उतरला नेता
या व्हायरल व्हिडीओमध्ये मैदान दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानात तरुणांच्या गराड्यात एक नेता हातात बॅट घेऊन दिसत आहेत. शॉट मारण्याच्या नादात नेत्याचा तोल गेला आणि ते पडले. यानंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. हा व्हिडीओ कधी आणि केव्हा काढलेला आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, शॉट मारण्याच्या नादात त्यांचा तोल गेला आणि ते तोंडावर जमिनीवर पडले.
शॉट मारण्याच्या नादात गेला तोल
हा मजेदार व्हिडीओ @Amanprabhat9 नावाच्या एक्स म्हणजेच आधीचं ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला दिसेल की, तरुणांनी क्रिकेट स्पर्धेच्या उद्भाटनासाठी नेत्याला निमंत्रण दिलं होतं. यानंतर या नेत्याला फलंदाजी करण्याचा मोह आवरला नाही आणि त्याने बॅट हातात घेतली. जोरदार शॉट मारण्याच्या नादात त्यांचा तोल गेला. त्यांनी शॉट मारण्यासाठी बॅट टोलावली आणि त्यासोबत त्यांचा तोल गेला. यानंतर त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण, त्यांना स्वत:ला सावरता आलं नाही. त्यामुळे ते भरमैदानता तोंडावर पडले.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या तुफान कमेंट पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून शेअरही केला आहे.