Teacher Romantic Photoshoot with Student : शाळेतील शिक्षिकेचं विद्यार्थ्यासोबत (Student-Teacher) व्हायरल रोमँटिक फोटोशूट (Romantic Photos) चांगलच व्हायरल झालं आहे. या आक्षेपार्ह फोटोशूटनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक लावल्याची प्रतिक्रिया या फोटोशूटवर सोशल मीडिया युजर्सने दिली आहे. हे फोटोशूट व्हायरल झाल्यावर शाळआ प्रशासनाने संबंधित शिक्षिकेचं निलंबन केलं आहे. दरम्यान, या फोटोशूटवर शिक्षिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिक्षिका आणि विद्यार्थ्याचं रोमँटिक फोटोशूट चर्चेचा विषय
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुरुगमल्ला गावातील शासकीय शाळेतील हे प्रकरण समोर आलं आहे.शाळेच्या सहलीला गेलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत मिठी आणि किस करत केलेलं रोमँटिक फोटोशूट सध्या चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे फोटोमध्ये दिसणारी 42 वर्षीय महिला शिक्षिका सरकारी शाळेची मुख्याध्यापिका असून मुलगा दहावी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आहे.
फोटोशूटवर संबंधित शिक्षिकेची प्रतिक्रिया
या व्हायरल फोटोंमध्ये शिक्षिका एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे रोमँटिक पोझ देताना दिसत आहे. शिक्षिका आणि विद्यार्थी एकमेकांना मिठी मारताना, गालावर चुंबन घेताना दिसत आहेत, विद्यार्थ्याने शिक्षिकेला उचलून घेत आणि गुलाह देतानाही फोटो काढला आहे. दरम्यान, या फोटोशूटवर संबंधित शिक्षिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे. शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिकेला फोटोशूटबद्दल विचारल्यावर तिने आपल्यामध्ये आई-मुलाचं नातं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
खासगी फोटो लीक झाल्याची माहिती
हे प्रकरण मुरुगमल्ला गावच्या सरकारी हायस्कूलशी संबंधित आहे. एनडीटिव्हीच्या रिपोर्टनुसार, शाळेच्या अधिकाऱ्यांनी शिक्षिकेला व्हायरल फोटोशूटबाबत विचारणा केली असता शिक्षिकेनं सांगितलं की, त्या विद्यार्थ्यासोबत माझं आई-मुलाचं नातं आहे. हे फोटो खासगी असून ती लीक झाल्याचेही सांगण्यात आले.
शिक्षिकेचं निलंबन, पुढील तपास सुरु
सार्वजनिक सूचना उपसंचालक (DDPI) बैलानजीनाप्पा यांनी संबंधित शिक्षिकेला निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. निलंबित शिक्षिकेची प्राथमिक चौकशी सुरु आहे. याप्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत तिला माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमित सिंग राजावत नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजे आधीचं ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक महिला शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत काही फोटोंमध्ये दिसत आहे. यातील काही फोटोमधील पोझवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहेत. अमितने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''समाज म्हणून आपण कोणत्या दिशेने जात आहोत?कर्नाटकातील मुरुगमल्ला चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेचे दहावीच्या विद्यार्थ्यासोबत फोटोशूटचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.'' यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (BEO) यांच्याकडे तक्रार केली. शिक्षिकाच्या वर्तनाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, नेटकरी शिक्षिकेसह विद्यार्थ्यावरही कारवाईची मागणी करत आहेत.