Daily Life Intresting Fact : आपण दैनंदिन आयुष्यामध्ये (Daily Life) अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा वापर करतो. आपण या गोष्टींकडे जास्त बारकाईने लक्ष देत नाही. पण आपण दररोज वापरत असलेल्या गोष्टींबाबत अनेक मनोरंजक गोष्टी आपल्याला माहित नसतात. या वस्तू किंवा गोष्टींमागे काही ना काही फॅक्ट असतात, जे आपल्याला माहित नसतात. जसं की आपल्या दररोजच्या वापरातील जीन्स(Jeans). जीन्सवर छोटे पॉकेट (Small Pockets on Jeans) असतात, याचा वापर अनेक जण पैशांची नाणी ठेवण्यासाठी करतात. पण या पॉकेटमागेही काही मनोरंजर फॅक्ट आहे, जे तुम्हाला माहित नसेल. याशिवाय बबल रॅपचा वापर नेमका कशासाठी केला जातो, हे तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल तर दैनंदिन जीवनातील मनोरंजक गोष्टींबाबत येथे जाणून घ्या.


जीन्सवरील छोट्या पॉकेटचं काम काय? (What is the Function of Small Pockets on Jeans?)


जर तुम्ही जीन्स वापरत असाल, तर तुम्हाला माहित असेल की जीन्सवर छोटे पॉकेट असतात. तुमच्या पैकी बरेच जण या छोट्या खिशांचा वापर नाणी ठेवण्यासाठी करतात. पण हा छोटा खिसा बनवण्यामागचं कारण काही वेगळं आहे. हे छोटे पॉकेट बनवण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. यामागचं कारण म्हणजे जुन्या काळात मनगटावर बांधण्यात येणारी घड्याळ नव्हती त्याऐवजी छोटी गोल घड्याळं असायची. त्या काळात ही छोटी घड्याळं वेस्टकोटसोबत परिधान केली जायची आणि ते ठेवण्यासाठी म्हणून जीन्समध्ये हे छोटे पॉकेट तयार करण्यात आले.


बबल रॅपचा मूळ उपयोग काय? (What is Original Use of Bubble Wrap?)


छोटे-मोठे अनेकांना बबल रॅप फोडण्याचा मोह आवरता येत नाही. बबल रॅप काचेच्या किंवा अलगद हाताळण्याच्या वस्तूंसाठी वापरला जातो. पण हा बबल रॅपचा खरा उपयोग नाही. 1957 साली दोन इंजिनिअर्सनी बबल रॅपचा वॉलपेपर म्हणून शोध लावला होता. दोन इंजिनियन टेक्चर वॉलपेपर बनवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी दोन शॉवर कर्टन एकमेकांसोबत चिकटले, पण हे चिकटताना त्यामध्ये हवा गेली आणि त्यामुळे छोटे फुगे तयार झाले. सुरुवातीला ही संकल्पना कुणालाही आवडली नाही. त्यानंतर या बबल रॅपचा वापर सामानाच्या पॅकिंगसाठी केला जाऊ लागला. याशिवाय एका संशोधनात समोर आलं आहे की, सुमारे एक मिनिटांपर्यत बबल रॅप पॉप केल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो.