What is the Cost of Train : ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोर येथे अलिकडेच (2 जून 2023) झालेल्या रेल्वे अपघातानं संपूर्ण देशाला हेलावून टाकलं. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक आहे. या दुर्दैवी अपघातात 288 लोकांना जीव गमवावा लागला नाही, तर 1000 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या भीषण अपघाताल शेकडो जणांच्या मृत्यू झाला त्यासोबतच तीन रेल्वे गाड्यांचाही चक्काचूर झाला.


भारतात जगातील सर्वात मोठे रेल्वेचं जाळं 


भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखलं जातं. भारतात जगातील सर्वात मोठे रेल्वेचं जाळं पसरलं आहे. भारतीय रेल्वेचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. क्वचितच असा एखादा जिल्हा किंवा गाव असेल, अद्याप रेल्वे पोहोचलेली नाही. भारतात 13,500 हून अधिक रेल्वे गाड्या धावतात. आजही बहुतेक लोक प्रवासासाठी ट्रेनचीच निवड करतात. 


ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो, हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर ट्रेनच्या इंजिनपासून ते ट्रेनच्या बोगीपर्यंतचा संपूर्ण ट्रेन तयार करण्यासाठी किती खर्च येतो, हे सविस्तर जाणून घ्या. ट्रेनमध्ये जनरल, स्लीपर आणि एसी असे कोच म्हणजेच बोगी असतात. हे सर्व डबे बनवण्यासाठी वेगवेगळा खर्च येतो.


एका कोचची किंमत 2 कोटी


मीडिया रिपोर्टनुसार, स्लीपर कोच तयार करण्यासाठी साधारणपणे 1.5 कोटी रुपये खर्च येतो. तर जनरल कोच तयार करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. तर एसी कोच तयार करण्यासाठी सर्वाधिक खर्च येतो. एक एसी कोच तयार करण्यासाठी 2 कोटी रुपये खर्च येतो. 24 कोच असलेली एक ट्रेन बनवण्यासाठी 48 कोटी रुपये खर्च येतो. ट्रेनमध्ये कोचपेक्षा इंजिनची रक्कम सर्वाधिक आहे. रेल्वेच्या एका इंजिनची किंमत 18 ते 20 कोटी रुपये आहे.


एका ट्रेनची किंमत किती?


जर ट्रेनमध्ये स्लीपर कोचची (Sleeper Coach) संख्या 10 असेल आणि एसी कोचची (AC Coach) संख्या 8 असेल आणि त्यासोबत 2 जनरल कोच (General Coach) देखील केले तर या ट्रेनची एकूण किंमत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. 


वंदे भारत ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो?


वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Eaxpress) ट्रेन बनवण्यासाठी 110 ते 120 कोटी रुपये खर्च येतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Odisha Train Accident : मृतदेह ठेवलेल्या शाळेत जाण्यास विद्यार्थ्यांचा नकार, भीतीचं वातावरण; सरकारला इमारत पाडण्याचं आवाहन