North Korea Viral Footage : उत्तर कोरियाच्या (North Korea) त्यांचा हुकूमशाह किंम जोंग उन (Kim Jong Un) याच्यामुळे जास्त चर्चेत असतो. किम जोंग उन क्रूरतेसाठी ओळखला जातो. तेथील विचित्र नियम आणि शिक्षा यामुळे जगभरात तो नेहमीच चर्चेत असतो. किम जोंग उत्तर कोरियातील जनतेवर विचित्र आणि कठोर नियम लादतो, ज्याचे उल्लंघन केल्यावर त्यांना अतिशय क्रूरपणे शिक्षाही दिली जाते. यासंबंधित अनेक मीडिया रिपोर्ट व्हायरल होत असतात. मात्र, आता यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उत्तर कोरियामध्ये दोन मुलांना शिक्षा देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर कोरियामधील कठोर शासनाचा व्हिडीओ झाला आहे. दोन तरुणांना दक्षिण कोरियन व्हिडीओ (K-Pop K-Drama) पाहणं महागात पडलं. उत्तर कोरियातील दोन तरुणांनी दक्षिण कोरियन चित्रपट, ड्रामा आणि के-पॉप गाण्यांचे व्हिडीओ पाहिल्यामुळे त्यांना 12 वर्ष सक्तमजुरीची शिक्षणा देण्यात आली. यावेळीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचा गावा करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणांना आरोपीप्रमाणे हात बांधून उभे केल्याचं दिसत आहे. 


हे प्रकरण दक्षिण कोरियन चित्रपट आणि संगीताशी संबंधित आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ उत्तर कोरियाच्या मोठ्या शहर प्योंगयांगचा असल्याचं बोललं जात आहे. या व्हायरल व्हिडीओमधील दोन मुलांचे वय 16 वर्षांच्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसमोर दोन मुलांचे हात बांधल्याचं दिसत आह. हा व्हिडीओ कोविडच्या काळातील असू शकतो कारण, यामध्ये अनेक लोक मास्क घातलेले दिसत आहेत.


पाहा व्हायरल व्हिडीओ :






उत्तर कोरियामधील विचित्र कायदे


उत्तर कोरिया तेथील हुकुमशाहाच्या मनाप्रमाणे चालणारा एक विचित्र देश आहे. उत्तर कोरियामध्ये दक्षिण कोरियातील गाणी किंवा मनोरंजनाशी संबंधित इतर गोष्टी पाहण्यावर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. दक्षिण कोरियाच्या बोलण्याच्या पद्धतीचं अनुकरण केल्यासही कठोर शिक्षा होते.


दरम्यान, उत्तर कोरियामधील शिक्षेचा व्हिडीओ सापडणे अतिशय दुर्मिळ आहे, कारण उत्तर कोरियाने देशातील फोटो, व्हिडिओ आणि इतर जीवनाचे पुरावे बाहेरील जगाकडे लीक करण्यास मनाई आहे. असे करणाऱ्याला कठोर शिक्षा केली जाते. हा व्हायरल व्हिडीओ बीबीसीला दक्षिण आणि उत्तर विकास (सँड) या संशोधन संस्थेने मिळवून दिला केला आहे, ही संस्था उत्तरे कोरियातून सुटका झालेल्यांसाठी काम करते.  भविष्यात कुणीही असं करु नये, म्हणून हा व्हिडीओ उत्तर कोरियामध्ये नागरिकांना इशारा म्हणून व्हायरल करण्यात आला होता, असं सांगितलं जात आहे.