New Year Party 2024 :  डिसेंबर महिना आला की सगळ्यांना नव्या वर्षाची आतुरता लागलेली असते. त्यात नव्या वर्षांचे संकल्प आणि वेगवेगळे फ्लॅन्सदेखील आखणं आधीपासूनच सुरु होतात. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या भन्नाट ठिकाणी जाऊन  नव्या वर्षाचं स्वागत  करण्याकडे अनेकांचा कल असतो आणि त्यात मग सगळेच गोव्याला जायचा प्लॅन करतात. त्यामुळे प्रत्येक 31 डिसेंबरला गोव्यात (Goa) गर्दी होते. देशातून विदेशातून लोक नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यातील आवडत्या बिचवर एकत्र येतात आणि मोठी गर्दी करत असतात. जर यावर्षी तुम्हाला गोव्यातील गर्दी नको असेल. चांगल्या दुसऱ्या ठिकाणी बिचवर नवीन वर्षाची पार्टी करायची असेल आणि तुम्ही नवनवे बिच शोधत असाल तर फार टेन्शन घ्यायची गरज नाही. आम्ही तुम्हाला भन्नाट बिच सुचवणार आहोत. ज्यामुळे तुम्ही जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत करु शकाल आणि शिवाय गोव्यासारखी गर्दीदेखील नसेल....


चेन्नई (Chennai)


दक्षिण भारतातील न्यू इयर सेलिब्रेशनसाठी चेन्नई हे भन्नाट डेस्टिनेशन ठरू शकते. इथे न्यू इयरच्या पार्ट्या खूप खास असतात. मरीना बीचवर संध्याकाळी एक वेगळीच मजा येते. मध्यरात्री येथील फटाक्यांमुळे समुद्रकिनारा उजळून निघतो. नववर्षाच्या दिवशी तुम्ही इथल्या नाईट क्लबमध्ये मित्रमैत्रिणींसोबत भरपूर धमाल करू शकता.


बिच कोणते?


मरिना बिच (Marina Beach)


ब्रिझी बिच (Breezy Beach)



व्ही.जी.पी गोल्डन बिच   (VGP Golden Beach)

 


 
कोची (kochi)



कोचीमध्ये ही नववर्षाचे सेलिब्रेशन खूप जल्लोषात केलं जातं. नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोचीन कार्निव्हलचं आयोजन केलं जातं. यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात आणि प्रत्येकाचा उत्साह जास्त असतो. येथील कार्निव्हलमध्ये संगीत, नृत्य, खाद्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, बाईक आणि सायकल रेस, रॅली, बीच फुटबॉल या सगळ्याची फेस्टिव्हलमध्ये मज्जा असते. अशावेळी तुम्ही इथे येऊन समुद्र किनाऱ्यावर खास पद्धतीने नवीन वर्षाचा आनंद घेऊ शकता.


बिच कोणते?
चेराई बिच (cherrai beach)
फोर्ट कोची बिच (Fort kochi beach)
महात्मा गांधी बिच (mahatma Gandhi Beah)
 







कर्नाटक (karnatak)


आपण कर्नाटक आणि त्याची राजधानी बेंगळुरूमधील मित्रांसोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे प्लॅन करू शकता. इथले पब, क्लब आणि लाउंज खूप खास आहेत. कर्नाटकच्या बीच आणि रिसॉर्टमध्ये नववर्षाच्या निमित्ताने खास इव्हेंट्स आयोजित केले जातात. या इव्हेट्सची बुकींगदेखील काही महिन्याआधीपासून सुरु होते. त्यामुळेअनेक लोक बुक करुन अशा इव्हेट्समध्ये सहभागी होत असतात आणि नव्या वर्षाचं स्वागत करत असतात. 


बिच कोणते?


गोकर्ण बिच (Gokarna Beach)


ओम बिच (om beach)


कुडल बिच (Kudle Beach)






इतर महत्वाची बातमी-


North Goa Vs South Goa : नॉर्थ गोवा की साऊथ गोवा? फिरण्यासाठी कोणतं ठिकाण ठरेल सर्वोत्तम? A टू Z माहिती