Pulsar Star : अवकाशात (Space) अनेक रहस्य लपलेली आहेत, असं म्हटलं जातं. ब्रह्मांडामधील अनेक गूढ अद्याप समोर आलेली नाहीत. जगभरातील अनेक खगोलशास्त्रज्ञांकडून याबाबत संशोधन सुरु आहे. आता विश्वातील एका अनोख्या ताऱ्याचा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांनी या ताऱ्याचं नाव 'न्यूट्रॉन स्टार' किंवा 'डेट स्टार' असं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे असा तारा करोडो वर्षांनंतर एखाद्या वेळी तयार होतो, त्यामुळे हा तारा खूप खास आहे.
हा नवा तारा कोणता?
शास्त्रज्ञांनी या नवीन ताऱ्याचं नाव J1912-4410 असं ठेवलं आहे. हा एक खास प्रकारचा पल्सर तारा असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे. हा तारा दिसणंही खूप कठीण आहे. हा पल्सर तारा फारच दुर्मिळ प्रक्रियेने तयार होतो. ही प्रक्रिया फारच अनोखी आहे. शास्त्रज्ञांनी शोधलेला हा नवीन पल्सर तारा आपल्या आकाशगंगेपासून 773 प्रकाशवर्षे दूर आहे. पल्सर तारा एक प्रकारचा न्यूट्रॉन तारा असतो. जेव्हा एखादा न्यूट्रॉन तारा स्वतःच्या आकारमानामुळे आणि वजनामुळे संकुचित होतो तेव्हा पल्सर तारा तयार होतो. एखादा न्यूट्रॉन तारा अशा प्रकारे संकुचित होतो, त्यानंतर लगेचच त्यामध्ये सुपरनोव्हा स्फोट होऊन पल्सर तारा जन्माला येतो.
हा पल्सर तारा इतर तार्यांपेक्षा वेगळा कसा?
आता सापडलेला हा पल्सर तारा इतर तार्यांपेक्षा वेगळा कसा आहे, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल. तर, त्याचं उत्तर जाणून घ्या. या खास ताऱ्यांना न्यूट्रॉन तारे किंवा डेड स्टार असं देखील म्हणतात. म्हणजेच हे एक प्रकारच्या मृत ताऱ्यांप्रमाणे असतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हे तारे त्यांच्या केंद्रस्थानी सतत फिरतात, यामुळे त्यांच्याभोवती एक अतिशय शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार होते.
याआधी 14 वर्षाच्या पल्सर ताऱ्याचा शोध
याआधीही एक पल्सर तारा शास्त्रज्ञांनी शोधून काढला होता. या ताऱ्याचं वय 14 वर्ष होतं. 2022 साली हा पल्सर तारा सापडला होता. या ताऱ्याचं नाव VT1137-0337 असं होतं. हा ताराही एक प्रकारचा न्यूट्रॉन तारा होता. सर्वात आधी हा तारा अवकाशातील एक प्रकारची वस्तू आहे, असं खगोलशास्त्रज्ञांना वाटलं होतं. 2018 मध्ये न्यू मेक्सिकोच्या व्हेरी लार्ज ॲरे स्काय सर्व्हेद्वारे हा तारा पहिल्यांदा दिसला होता. गाया स्पेस ऑब्झर्व्हेटरीने गोळा केलेल्या माहितीचा या ताऱ्याच्या शोध लागल्याचं म्हटलं जातं.