AC Electricity Bill : एसी (Air Conditioner) खरेदी करताना प्रत्येकाच्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे वीज बिल (Electricity Bill). एसी म्हटलं की, डोळ्यासमोर वीजबिलाचे आकडे वाढताना दिसतात. एसी वापरल्यामुळे विनाकारण वीज बिल जास्त येईल, अशी लोकांमध्ये भीती असते. एका तासात एसी किती वीज वापरतो, हे जाणून घ्या. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकाल की तुम्ही दिवसभरात किती वेळ एसी चालवल्यावर तर किती वीज खर्च होईल आणि त्याचा तुमच्या खिशावर किती परिणाम होईल.
एका तासात एसी किती वीज वापरतो?
कुणीही एसी विकत घेताना सर्वात आधी विचार करतो की, कोणत्या एसीमुळे खोली जास्त थंड होऊ शकेल आणि एसीचे वीज बिल किती येईल. एसी बिलाच्या भीतीमुळे लोक एसीही कमी वापरतात किंवा काही जण तर वीज बिलाचा धसका घेऊन एसी खरेदी करणंच टाळतात. पण एसी नेमकी किती वीज वापरतो, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या.
तुमच्या एसी किती विज वापरतो?
प्रत्येक एसीनुसार विजेचा वापर बदलतो. एसी किती विज वापरतो, हे खोलीत किती लोक आहेत, खोली किती मोठी आहे म्हणजेच तिचा आकार, खोली कोणत्या मजल्यावर आहे, एसी कोणता आहे, एसी किती टन आहे, एसी कसा वापरला जातो, किती जुना आहे, या सर्व गोष्टींवर अवलंबून आहे. त्यामुळे अनेक गोष्टी लक्षात घेऊन कोणत्या एसीमुळे किती वीज खर्च होईल, हे परिस्थितीनुसार ठरतं.
एका तासाचं गणित काय?
जर तुम्ही तासाच्या आधारावर पाहिले तर 5 स्टार एसी कमी वीज वापरतो तर 3 स्टार एसी जास्त वीज वापरतो. 1.5 टनाचा 5 स्टार एसी एक तास चालवला तर 1.5 युनिट वीज खर्च होते आणि 1.5 टन 3 स्टार एसी 1.5 युनिट वीज वापरतो, असं मानलं जातं. आता तुमच्या राज्याच्या विजेच्या दरानुसार किती वीज वापरली जाते याचा अंदाज तुम्ही लावू शकता. जर तुम्ही जितके तास एसी वापरत असाल, त्या संख्येला 30 ने गुणाकार केल्यास तुम्हाला तुमच्या महिन्याच्या खर्चाचा अंदाज येईल.