Trending News : आजकाल माकड आणि कुत्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं मनोरंजन करत आहे. व्हिडीओमध्ये एक माकड घराच्या छतावर असलेल्या कुत्र्याच्या जवळ येत त्याला मिठी मारून त्याच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसत आहे. अनेक वेळा कुत्रे आणि माकडांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कुत्रा आणि माकड एकमेकांसोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.


कुत्रा आणि माकडाचा छत्तीसचा आकडा असल्याचं नेहमी पाहायला मिळतं. रस्त्यावर माकडे दिसताच कुत्रे त्यांना घाबरवताना दिसतात. तर कधी माकडे कुत्र्यांसोबत टिंगल करताना दिसतात. अशात आता कुत्रा आणि माकडाच्या खास मैत्रीचा व्हिडीओ दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये माकड कुत्र्याजवळ जाताना, त्याला मिठी मारताना आणि त्याचे चुंबन घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगले चकीत झाले आहेत.







व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक जर्मन शेफर्ड कुत्रा घराच्या छतावर भिंतीजवळ उभा असल्याचं दिसत आहे. तेव्हा समोरच्या घराच्या गच्चीवर असलेल्या दोन माकडांपैकी एक माकड कुत्र्याजवळ येतो. कुत्र्याजवळ येताच माकड त्याला मिठी मारतो. त्यानंतर माकड कुत्र्याच्या डोळ्यात पाहतो. त्यानंतर माकड कुत्र्याच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसते.


सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स खूप आनंदी झाले आहेत. या व्हिडीओला सोशल मीडियावर दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कुत्रा आणि माकडाची गट्टी जमल्याचं म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :