Trending News : साप पाहून कोण घाबरत नाही? ते तर सोडाच, काही लोक सापाचे नाव ऐकूनही थरथरू लागतात. जगात सापांच्या हजारो प्रजाती आढळतात, परंतु त्यापैकी फक्त काही साप आहेत, जे विषारी आणि धोकादायक आहेत. विषारी आणि धोकादायक सापांच्या यादीत पहिले नाव किंग कोब्राचे येते. किंग कोब्राबद्दल सांगायचे तर, तो चावल्यानंतर वेळेवर उपचार केले नाहीत तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो किंवा कोमातही जाऊ शकतो.


ब्लॅक कोब्राचा धक्कादायक व्हिडिओ खूप व्हायरल
सोशल मीडियावर ब्लॅक कोब्राचा एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती न घाबरता नागाला पाणी पाजताना दिसत आहे. या व्यक्तीने हातात काचेचा ग्लास धरला आहे, ज्यामध्ये पाणी आहे आणि एक धोकादायक काळा कोब्रा तोंडाने पाणी पीत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @thefigen नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ केवळ 9 सेकंदांचा आहे, या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.


 






नेटिझन्सचे कमेंट


सापाला पाणी देतानाच्या या व्हिडिओवर नेटिझन्सनी कमेंटही केल्या आहेत. एका युजरने म्हटले की, 'कोब्राला पाणी देणे खूप धोकादायक ठरू शकते.' त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, 'पाणी पिऊन त्याने काय केले, ज्याच्या प्रत्युत्तरात आणखी एका यूजरने मजेशीरपणे लिहिले की, कदाचित त्याने 100 रुपये मागितले असतील.'


 


महत्वाच्या बातम्या :