Trending Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक वेळा काही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना पाहायला मिळतात. अनेक वेळा या व्हिडीओंवर विश्वास ठेवणं आपल्याला कठीण जातं. कधी-कधी तर स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणंही कठीण होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही रस्त्यात खड्डे पाहिले असतील. पण तुम्ही कधी स्विमिंग पूलमध्ये खड्डा पडल्याचं पाहिलं आहे का? समजा तुम्ही स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत आहात आणि अचानक स्विमिंग पूलमध्ये भला मोठा खड्डा पडला तर... हा विचारही तुम्हांला भीतीदायक वाटत असेल ना? पण अशीच एक घटना घडली आहे.


सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक पूलमध्ये पार्टी सुरु असताना अचानक स्विमिंग पूलमध्ये मोठं भगदाड पडताना दिसत आहे. या घटनेवर तिथे उपस्थितांचाही विश्वास बसत नव्हता. हाऊस पार्टीवेळी अचानक पूलमध्ये मोठा खड्डा पडतो आणि पार्टीमध्ये हजर प्रत्येक जण हैराण होतो. हा खड्ड्यामध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ






सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ इस्त्राइलमधील आहे. इस्त्राइलमधील एका पूल पार्टीदरम्यान ही दुर्घटना घडली. अचानक स्विमिंग पूलमध्ये खड्डा तयार झाला. ही घटना लक्षात येताच आजूबाजूला हजर असलेल्या लोकांनी स्विमिंग पूलमधील लोकांना तात्काळ स्विमिंग पूलमधून बाहेर येण्यास मदत केली.


ग्लोबल न्यूज रिपोर्टनुसार, इस्त्राइलमध्ये तेल अवीवपासून 40 किलोमीटवर असणाऱ्या योसेफ शहरात गुरुवारी ही दुर्घटना घडली. पार्टी सुरु असताना पाण्याने भरलेल्या स्विमिंग पूलमध्ये मोठा खड्डा पडला. पाहता-पाहता स्विमिंग पूलमधील सर्व पाणी खड्ड्यात वाहून गेलं. पाण्यासोबत खड्ड्यात पडून एका माणसाचा मृत्यू झाला आहे. 


स्विमिंग पूलमध्ये पडला 43 फूट खोल खड्डा
अचानक स्विमिंग पूलमध्ये खड्डा पडला. या खड्ड्यात पडून किम्ही नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.