UP Man Born with Uterus : एका 30 वर्षीय तरुण आणि त्याची पत्नी बाळ होण्यासाठी प्रयत्न करत होते. लग्नाच्या पाच वर्ष झाल्यानंतरही या जोडप्याला मूल होत नव्हतं. त्यामुळे या तरुणाने पत्नीसह बाळासाठी वैद्यकिय उपचार घेण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे दोघे पती-पत्नी डॉक्टरांकडे गेले. मात्र, डॉक्टरांना तपासणी दरम्यान जे आढळलं त्यामुळे पती-पत्नीसह डॉक्टरही चांगलेच चकित झाले. डॉक्टरांनी या तरुणाच्या शरीरात गर्भाशय (Uterus) आणि अंडाशय (Ovaries) आढळलं. तरुणाला आतापर्यंत ही बाब माहितचं नव्हती, त्यामुळे पती-पत्नी दोघेही आश्चर्यचकित झाले.


पुरुषाच्या शरीरात आढळलं गर्भाशय


उत्तर प्रदेशातील ही घटना समोर आली आहे. फरीदाबाद येथील एक तरुण तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेला. यावेळी डॉक्टरांनी  MRI केल्यावर त्यांना तरुणाच्या शरीरात विकसित गर्भाशय, अंडाशय आणि फॅलोपियन ट्यूब आढळली. तरुणाने सांगितलं की, त्याला लहानपणापासून आतापर्यंत काहीही त्रास झालेला नाही.


30 वर्ष जगतोय पुरुषाचं आयुष्य


फरीदाबादमधील हा तरुण 30 वर्षांपासून एक पुरुष म्हणून आयुष्य जगत होता. पण त्याच्या शरीरात महिलांचे अवयव होते, हे त्याला ठाऊकचं नव्हतं. मात्र, ही फार असामान्य बाब नाही. याआधीही पुरुषांच्या शरीरात महिलांचे अवयव आढळले आहेत. फरीदाबाय येथील अमृता हॉस्पिटल (Amrita Hospital) मध्ये या तरुणावर उपचार करण्यात आले आहेत.


अमृता हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं की, रुग्णाला पर्सिस्टंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम (PMDS-Persistent Mullerian Duct Syndrome) हा दुर्मिळ आजार होता. यामध्ये शरीरात दोन्ही लिंगाचे अवयव विकसित होतात. दरम्यान, या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या शरीरातील महिलांचे अवयव काढण्यात आले आहेत.


रोबोटिक ऑपरेशनद्वारे या तरुणाच्या शरीरातील महिलांचे अवयव काढण्यात आले आहेत. आता तो सामान्य जीवन जगू शकतो. पण त्याचे टेस्टिसमध्ये शुक्राणू तयार होऊ शकत नाहीत, त्यामुळे त्याला स्वतःचं मुलं होऊ शकत नाही. हे कपल टेस्ट ट्यूब बेबी करून बाळ जन्माला घालू शकतात. पण यासाठी त्याला दात्याची गरज भासेल.