Sultan Mahmud Begada or Mahmud Shah I : इतिहासात असे अनेक राजे (King) होऊन गेले, ज्यांच्याबद्दल फार रंजक गोष्टी सांगितल्या जातात. काही गोष्टींची कल्पना करणं जवळजवळ अशक्य आहे. अनेक राजे युद्धामधील त्यांची अतुलनीय कामगिरी आणि शौर्यामुळे इतिहासात अमर झाले. काही शासकांच्या शौर्याची, तर कुणाच्या भ्याडपणाच्या कथा प्रचलित आहेत. अशाच एका शासकाबाबत काही रंजक गोष्टी जाणून घ्या. हा मोगल शासक दररोज जेवणातून विषप्राशन करायचा. मुघल शासक शासक 'मोहम्मद बगदा' हा 'महमूद बेगडा' या नावानेही ओळखला जातो. हा राजा 


इतिहासातील सर्वात विषारी शासक 'मोहम्मद बगदा'


मुघल शासक सुलतान मोहम्मद बगदा याला इतिहासातील सर्वात विषारी शासक म्हटलं जातं. महमूद बगेडा या नावाने हा राजा प्रसिद्ध आहे. मोहम्मदच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याच्या सवयी फार वेगळी आणि विचित्र होती. सामान्य माणसाच्या तुलनेने या सवयी फार भयानक म्हटलं आहे. त्याचे नातेवाईक आणि जवळचे मित्रही त्याला घाबरायचे. महमूद बगेडा उर्फ महमूद शाह (पहिला), याच्याकडे वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी गुजरातची गादी आली. त्यानंतर त्याला लोक मोहम्मद बगदा उर्फ महमूद बगेडा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याने वयाच्या 52 व्या वर्षापर्यंत गुजरातवर राज्य केलं.


दररोज जेवणातून करायचा विषप्राशन


सुलतान मोहम्मद बगदा दररोज जेवणातून करायचा विषप्राशन करत असे. प्रचलित कथांनुसार, त्याच्या शरीरावर बसलेली माशीही जिंवत राहत नसे, कारण त्याच्या शरीरात विष होतं. त्याने लहानपणापासूनच दररोज जेवणातून विषप्राशन करण्यास सुरुवात केली. दररोज विष सेवन केल्यामुळे त्याचं शरीर अत्यंत विषारी झालं होतं, यामुळे त्याचा शरीरावर माशी जरी बसली तरी विषबाधेमुळे ती माशीही जिवंत राहत नसे. 


'हे' आहे विष पिण्याचं कारण


प्रचलित कथांनुसार सांगितलं जातं की, फार लहान वयात सत्ता हाती आल्यामुळे शत्रूने शासकाची गादी मिळावी यासाठी मोहम्मद बगदाला टक रचून मारण्याचा प्रयत्न केला. एकदा शत्रूने कट रचून राजा मोहम्मद बगदा याला मारण्यासाठी जेवणातून विष पाजलं होतं. या कटातून तो बचावला पण त्यानंतर त्याने ठरवलं की, यापुढे विषबाधा होऊ नये म्हणून त्यानं टोकाचं पाऊल उचललं. त्यानं स्वत:वर विविध प्रयोग करून विषबाधेपाासून बचाव करण्याचं ठरवलं. यासाठीच त्याने दररोज जेवणातून थोड्या-थोड्या प्रमाणात विषप्राशन करायला सुरुवात केली. यामुळे त्याच्या शरीरावर विषबाधेचा परिणाम होणार नाही, असा त्याचा समज होता.


मोहम्मद बगदाने लहानपणापासूनच अन्नासोबत विष प्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचं शरीर विषारी बनलं. विषबाधेने आपला मृत्यू होऊ नये यासाठी राजाने ही विचित्र सवय लावली होती. या राज्यासोबत संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांचाही विषबाधेने मृत्यू झाला, असंही सांगितलं जातं. पोर्तुगीज प्रवासी बाबोसा याच्या 'द बुक ऑफ ड्युरेट बाबोसा खंड 1' या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.


35 किलो अन्न खायचा बगदा


मोहम्मद बगदा खवय्या होता, त्याला जेवणाची खूप आवड होती. तो एका वेळी भरपूर अन्न खात असे. बगदा एका वेळी सुमारे 100 केळी खायचा. तर नाश्त्यात अनेक वाट्या मध आणि लोणी खात असे. त्यांच्या पलंगाच्या शेजारी अनेक खाद्यपदार्थ ठेवण्यात यायचे, ज्यामुळे कधीही भूक लागल्यावर त्याला खाता यायचं. मोहम्मद बगदा दररोजचा सुमारे 35 किलो अन्न खायचं असं सांगितलं जातं.