Lover Pasted Threating Poster for Groom : एका वेड्या प्रियकराचं पोस्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरलं आहे. 'करिश्मा मेरी है...बारात मत लाना.. समशान बना दूँगा' हा कोणत्याही चित्रपटातील डायलॉग नाही तर, एका प्रियकराची त्याच्या प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याला दिलेली धमकी आहे. 'करिश्मा मेरी है...' अशा आशयाचं पोस्टर नवरदेवाच्या घराबाहेर लागलं आहे. इतकंच नाही तर या प्रेमवेड्या तरुणाने हे पोस्टर लावल्यानंतर त्याने घराबाहेर पेट्रोल बॉम्बही फोडले आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.


लग्न म्हटलं की मोठं शुभ कार्य. या शुभ कार्यात कोणतीही अडचण नको म्हणून खूप काळजी घेतली जाते. पण कधी-कधी वर-वधू दोन्ही कुटुंबांमध्ये काही मतभेदही समोर येतात. तर कधी प्रेम प्रकरणामुळे लग्न चर्चेत असतात. याआधी सोशल मीडियावर 'सोनम गुप्ता बेवफा है...', 'विशाल मुझे भगा ले जाना...' असे नोटेवरील प्रेमाचे संदेश व्हायरल झाले होते. आता अशाच प्रकारचं हे धमकीचं पोस्टर चर्चेत आहे.


प्रियकराने नवऱ्याच्या घराबाहेर लावलं पोस्टर


18 फेब्रुवारीला मोंटी सिंह याचं लग्न आहे. पण त्याच्या होणाऱ्या बायकोच्या प्रियकराने नवऱ्याच्या घराबाहेर धमकीचं पोस्टर लावलं आहे. हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हापुडच्या सिंभावली पोलीस ठाणे क्षेत्रातील फरीदपूर गावातून समोर आलं आहे. नवरीच्या प्रियकराने धमकीचं पोस्टर होणाऱ्या नवराऱ्या घराबाहेर लावलं आहे. हे पोस्टर इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.


सोशल मीडियावर धमकीचं पोस्टर चर्चेत






'करिश्मा मेरी है...बारात लेकर मत आना'


प्रियकराने या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, 'कान खोलकर सुन मोंटू सिंह दूल्हे राजा, करिश्मा मेरी है...बारात लेकर मत आना... नहीं तो तू जिंदा नहीं बचेगा...बारात को शमशान बना दूंगा.. जिस भाई को दावत के साथ गोली भी खानी हो, वही बारात में आये. अभी केवल हल्का सा ट्रेलर देकर जा रहा हूं, बाकी फिल्म बारात में चलेगी. यार डिफॉल्टर...'


या आधी अशा गोष्टी आपण केळव चित्रपटामध्ये पाहत आलो आहोत, आता ही गोष्ट यूपीतील हापुडच्या लोकांना अनुभवायला मिळाली. या घटनेची चांगलीच चर्चा या परिसरात आहे.