Naneghat Reverse Waterfall Video : पावसाळ्यात तुम्ही अनेक ठिकाणी छोटे-मोठे धबधबे पाहायला मिळतात. डोंगरकपारीतून वाहणारे धबधबे पाहूण मनाचं पारण फिटतं. तुम्ही आतापर्यंत डोंगरावरून खाली येणारे धबधबे पाहिले असतील, पण तुम्ही कधी खालून वर वाहणारा धबधबा पाहिला आहे का? हो आम्ही तुम्हाला रिवर्स वॉटरफॉल (Reverse Waterfall) बाबत विचारत आहोत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे. कारण यामध्ये दिसणारा धबधबा वरून खाली नाही तर खालून वरच्या दिशेला वाहत आहे.


सोशल मीडियावर रिवर्स वॉटरफॉल (Reverse Waterfall) व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्ही पाहिला आहे का? या व्हिडीओमध्ये धबधब्यातून पडणारं पाणी वरून खालच्या दिशेने येण्याऐवजी खालून वरच्या दिशेनं जाताना दिसत आहे. एका आयएफएस (IFS) अधिकाऱ्याने यासंगर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हा धबधबा उलट वाहण्यामागचं कारण जाणून घ्या.






 


महाराष्ट्रातील नाणेघाट धबधबा (Naneghat Reverse Waterfall)
आयएफएस अधिकारी सुसंता नंदा (IFS Officer Susanta Nanda) यांनी या उलट वाहणाऱ्या धबधब्याचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाणेघाट येथील धबधब्याचा आहे. हा धबधबा नाणेघाट हिल स्टेशन परिसरात आहे.


उलट वाहणाऱ्या धबधब्याचं कारण काय?
अधिकारी सुसंता नंदा यांनी हा धबधबा उलट वाहण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्यांन कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, 'जेव्हा वाऱ्याचा वेग आणि गुरुत्वाकर्षण बला समान पण विरुद्ध दिशेने असतो. त्यामुळे या धबधब्याचं पाणी वरून खाली पडण्याऐवजी खालून वरच्या बाजूला वाहत असल्याचा भास होतो.'


रिवर्श वॉटरफॉलच्या या व्हिडीओला आतापर्यंत 3.80 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हिरव्यागार डोंगरातून धबधबा वाहताना फारच सुंदर दृश्य दिसत आहे. हा धबधबा एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.