Uterus and Overy in Man's Body : एका 33 वर्षीय युवकाला लघवी करताना त्रास होत होता. त्याच्या लघवीमधून रक्तस्त्राव येत होतं. यामुळे तो तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेला असता, एक वेगळीच बाब समोर आली. डॉक्टरने तपासणीनंतर या युवकाला सांगितलं की, त्याच्या शरीरामध्ये स्त्रियांचे अवयव आहेत. तुम्हालाही हे ऐकून विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे.
युवकाच्या शरीरामध्ये गर्भाशय आणि अंडाशय
चीनमधील सिचुआन प्रांतातमध्ये ही घटना समोर आली आहे. इथे एका 33 वर्षीय युवकाला डॉक्टरांनी सांगितलं की तो, पुरुष नाही तर, महिला आहे. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना? या युवकाच्या शरीराच्या आतील अवयव महिलांचे होते. या युवकाच्या शरीरामध्ये गर्भाशय आणि अंडाशय असल्याचं पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. इतकंच नाही तर त्याला 20 वर्षांपासून मासिक पाळी येते. म्हणजे शारीरिक दृष्ट्या हा युवक पुरुष नसून महिला आहे.
युवकाला 20 वर्षापासून येते मासिक पाळी
डॉक्टरांनी सांगितलं आहे की, या युवकाच्या शरीरामध्ये जन्मापासूनच पुरुषांच्या अवयवासोबत महिलांचे अवयव होते. युवकाच्या शरीरामध्ये गर्भाशय (Uterus) (Overy) आणि अंडाशय होतं. युवकाने डॉक्टरांना सांगितलं की, त्याला लघवी करताना रक्तस्त्राव व्हायचा आणि यादरम्यानच्या काळात त्याला पोटदुखीचा त्रास व्हायचा. तपासणीनंतर डॉक्टरांनी युवकाला सांगितलं की, त्याला रक्तस्त्राव नाहीतर मासिक पाळी येत होती. हे सगळं त्याच्यासोबत गेल्या 20 वर्षांपासून सुरु होतं.
डॉक्टरांनी ऑपरेशन करुन महिलांचे अवयव काढले
युवकाने सुरुवातीला डॉक्टरांकडे समस्या सांगितल्यावर युवकाला अपेंडिसाइटिस असेल, असं डॉक्टरांना वाटलं. मात्र खरं कारण समोर आल्यावर डॉक्टरही चकित झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील महिलांचे अवयव ऑपरेशन करुन काढले आहेत. यानंतर युवकाला सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगता येणार आहे. पण हा युवक कधीही पिता होऊ शकणार नाही, कारण त्याच्या अंडकोशामध्ये शुक्राणू तयार होणार नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या